शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

गोरेवाडा जंगल सफारी ‘फुल्ल’

By admin | Updated: December 25, 2015 03:42 IST

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील जंगल सफारीसाठी सध्या पर्यटकांच्या रांगा लागत आहे.

पर्यटकांची गर्दी : नाईट सफारीला प्रथम पसंतीनागपूर : गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील जंगल सफारीसाठी सध्या पर्यटकांच्या रांगा लागत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अलीकडेच येथील रेस्क्यू सेंटर व जंगल सफारीचा शुभारंभ करण्यात आला. विशेष म्हणजे, येथे देशातील पहिली ‘जंगल नाईट सफारी’ सुरू करण्यात आली असून पर्यटकांची ती प्रथम पसंती ठरत आहे. गुरुवारी दुपारी गोरेवाडा जंगल पर्यटकांनी ‘फुल्ल’ झाले होते. वन विभागाने येथे जंगल सफारीसाठी तीन वेळा निश्चित केल्या आहेत. त्यानुसार पर्यटकांना सकाळी ६ ते १० वाजतापर्यंत, दुपारी ३ ते सायं. ५ वाजतापर्यंत व रात्री ६ ते ८.३० वाजतापर्यंत (नाईट सफारी) ची सुविधा उपलब्ध केली आहे. वन अधिकाऱ्यांच्या मते, सध्या या जंगलात बिबट, चितळ, मोर, सांबर व नीलगार्इंचा अधिवास आहे. याशिवाय येथे विविध प्रजातींचे दुर्मिळ पक्षीसुद्धा पाहायला मिळतात. अगदी शहराच्या सीमेवर असलेले हे जंगल नेहमीच नागपूरकरांच्या आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. मात्र या सोबतच येथे वन कर्मचारी व गाईडचा फार मोठा अभाव जाणवत आहे. त्यामुळे गुरुवारी या जंगलाच्या काटोल रोडवरील प्रवेशव्दारावर सहा-सहा वाहनांसोबत केवळ दोन गाईड पाठविले जात होते. पर्यटकांची येथील वाढती गर्दी लक्षात घेता, एफडीसीएमने येथे सोयी-सुविधा उपलब्ध करणे अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)भविष्यात आफ्रिकन सफारी सुरू होणार राज्य शासनाने मागील २०११ मध्ये विशेष पुढाकार घेऊन, या गोरेवाडा जंगलातील १९१४ हेक्टरमध्ये ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’ च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय या संपूर्ण प्रकल्पाची जबाबदारी महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या (एफडीसीएम) खांद्यावर देण्यात आली आहे. या प्रकल्पाला राष्ट्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची (सीझेडए) मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पाच्या मास्टर प्लॅननुसार पर्यटकांना सिंगापूरच्या धर्तीवर देशातील पहिली नाईट सफारी सुरू झाली आहे. याशिवाय भविष्यात आफ्रिकन सफारीचाही येथे आनंद लुटता येणार आहे. सोबतच या प्रकल्पात बर्ड पार्क, एन्टरटेन्मेंट हब, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, अ‍ॅम्ब्युसमेंट पार्क, प्ले झोन, रिसोर्ट व क्लब हाऊसची योजना आहे.