नाशिककरांसाठी गुड न्यूज! इंडिगोची गोवा नागपूरसह चार शहरांना जोडणारी सेवा १५ मार्च पासून सुरू होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2023 15:11 IST2023-01-26T15:10:54+5:302023-01-26T15:11:17+5:30
या सेवांसाठी 1 फेब्रुवारी पासून बुकिंग सुरू होण्याची शक्यता आहे.

नाशिककरांसाठी गुड न्यूज! इंडिगोची गोवा नागपूरसह चार शहरांना जोडणारी सेवा १५ मार्च पासून सुरू होणार
नाशिक- गेल्या अनेक महिन्यापासून प्रतीक्षेत असलेली इंडिगो कंपनीची गोवा, नागपूर, हैदराबाद, अहमदाबाद विमान सेवा येत्या 15 मार्च पासून सुरू होणार आहे. कम्पनीने तशी घोषणा केली आहे. त्यामुळे या सेवांसाठी 1 फेब्रुवारी पासून बुकिंग सुरू होण्याची शक्यता आहे.
नाशिक जिल्ह्यातील ओझर विमानतळ येथून उडान अंतर्गत सुरू असलेल्या विमान सेवा हळू हळू बंद पडत गेल्याने नाशिककरांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. सध्या स्पाईस जेटची दिल्ली आणि हैदराबाद साठी सेवा सुरू आहे. त्यानंतर इंडीगो कम्पनीने समर शेड्युल मध्ये नाशिकहुन गोवा, नागपूर, हैदराबाद, अहमदाबाद या शहरांसाठी विमान सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव दिला होता मात्र आता 15 मार्च पासून ही सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.