गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
By नरेश डोंगरे | Updated: May 21, 2025 00:25 IST2025-05-21T00:24:16+5:302025-05-21T00:25:16+5:30
नागपुरातून सर्वात पहिली सुरू झालेल्या बिलासपूर-नागपूर-बिलासपूर या वंदे भारत एक्सप्रेसला दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरातून हिरवी झेंडी दाखवली होती.

गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
नरेश डोंगरे,नागपूर
बिलासपूर-नागपूर-बिलासपूर मार्गावर रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने रेल्वे प्रशासनाला चांगलाच हुरूप आला आहे. या पार्श्वभूमीवर, वंदे भारत एक्सप्रेसच्या संरचनेत बदल करून या ट्रेनला आणखी ८ कोच जोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नागपुरातून सर्वात पहिली सुरू होणाऱ्या बिलासपूर-नागपूर-बिलासपूर या वंदे भारत एक्सप्रेसला दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरातून हिरवी झेंडी दाखवली होती. प्रारंभी ही गाडी सुसाट होती. मात्र, नंतर या गाडीला प्रवासी मिळेनासे झाले होते. त्यामुळे नागपूर ते बिलासपूर आणि बिलासपूर ते नागपूर मार्गावर रिकामी ठणठण धावत होती.
आता मात्र या मार्गावर प्रवाशांची संख्या चांगलीच वाढली असून, वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांची खच्चून भरून धावत आहे. या गाडीत बसायला जागा मिळेनासी झाली आहे. त्यामुळे अनेक प्रवासी तसेच संघटनांकडून या गाडीच्या डब्यात वाढ करावी, अशी मागणी केली जात होती.
ती लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने ट्रेन नंबर २०८२५/२६ बिलासपूर-नागपूर-बिलासपूर ट्रेनला आणखी ८ कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ही गाडी ८ कोचसह धावत आहे.
१ जूनपासून होणार सुधारणा
अशा प्रकारे आणखी आठ कोच जोडले जाणार असल्याने ही गाडी १६ कोचची होणार असून, त्यामुळे गर्दीला वैतागलेल्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. १ जून २०२५ पासून हा निर्णय अंमलात आणला जाणार आहे. त्यासंबंधाने मध्य रेल्वे प्रशासनाकडून आवश्यक तयारी केली जात आहे.