शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
7
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
8
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
10
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
11
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
12
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
13
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
14
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
15
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
16
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
17
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
18
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
19
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
20
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

अच्छे दिन आने वाले हैं..

By admin | Updated: May 16, 2014 00:41 IST

सर्वच टीव्ही वाहिन्यांवर प्रसारित होणार्‍या निवडणूकपूर्व विश्लेषणाने व्यापारी जगतात उत्साहाचे वातावरण आहे. छोटे-मोठे उद्योगच नव्हे तर देशात किरकोळ व्यवसायात काही वर्षांपासून आलेली ..

बाजारपेठांमध्ये उत्साह : किरकोळ व्यवसायाला गती मिळेल

नागपूर : सर्वच टीव्ही वाहिन्यांवर प्रसारित होणार्‍या निवडणूकपूर्व विश्लेषणाने व्यापारी जगतात उत्साहाचे वातावरण आहे. छोटे-मोठे उद्योगच नव्हे तर देशात किरकोळ व्यवसायात काही वर्षांपासून आलेली मरगळ दूर होईल आणि व्यवसायाची नवे दालने खुली होतील, असा सूर उद्योजक आणि किरकोळ व्यापार क्षेत्रातील व्यावसायिकांनी लोकमतशी बोलताना काढला. इतवारी आणि गांधीबाग बाजारपेठांमधील किराणा, धान्य, खाद्य तेल, रेडिमेड वस्त्र, कापड व्यवसाय, लोखंड बाजार, हार्डवेअर, पेंट, प्लॅस्टिक आदींसह सर्व बाजारपेठांमध्ये केंद्रात नवे सरकार येण्याच्या वृत्ताने उत्साहाचे वातावरण आहे.

व्यापार्‍यांना संचालित करणारे कायदे नकोत

निवडणूकपूर्व विश्लेषणे खरी ठरल्यास एनडीएला घोषणापत्रानुसार आश्‍वासने पूर्ण करावी लागतील. व्यापार्‍यांना संचालित करणारे कायदे नकोत, असे मत नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे कॅटच्या कार्यक्रमात व्यक्त केले होते. याशिवाय किरकोळ व्यापारात विदेशी गुंतवणूकदारांना स्थान नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यांच्या वक्तव्यानुसार एनडीए सरकार सत्तेत आल्याने किरकोळ व्यवसायात ‘अच्छे दिन आने वाले है’ असेच म्हणता येईल, असे मत अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे (कॅट) अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी व्यक्त केले. एनडीए सरकार देशातील किरकोळ व्यापार्‍यांच्या बाजूने राहील. देशातील किरकोळ व्यापारी अतिशय सक्षम आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाने ते व्यवसाय करण्यास अधिक दक्ष होतील. त्यांच्यासाठी काही विशेष धोरणे राबविण्याची गरज असल्याचे भरतीया यांनी स्पष्ट केले.

सराफा व्यवसायात भरभराट

गेल्या काही वर्षांपासून सोन्याचा व्यवसाय मंदीत आला आहे. वाढीव आयात शुल्क हे मुख्य कारण आहे. हे शुल्क रद्द करावे, अशी मागणी देशातील सर्वच सराफा संघटनांनी नेहमीच लावून धरली होती. पण हा कर अजूनही आकारला जात आहे. सराफा व्यवसायाच्या वाढीसाठी सकारात्मक शासकीय धोरणाची गरज आहे. व्यावसायिकांना प्रोत्साहन देणारे एनडीए सरकार आयात शुल्क रद्द करेल आणि सराफा व्यवसायात पुन्हा भरभराट येईल, अशी प्रतिक्रिया इतवारी सराफा असोसिएशनचे अध्यक्ष रविकांत हरडे यांनी दिली.

निर्यात वाढेल

एनडीए सरकार सत्तेत येण्याच्या वृत्ताने छोट्या-मोठय़ा उद्योजकांमध्ये आनंदाचे वातावरण असून बाजारात उत्साह आहे.गेल्या काही वर्षांपासून उद्योगांवर आलेले मंदीचे वातावरण दूर होईल. याशिवाय वाढलेली आयात दूर होऊन निर्यातीला वाव मिळेल. सत्तेवर आल्यानंतर काही दिवसात निश्‍चितच फरक दिसून येईल. केंद्रातील नवीन सरकारमुळे तसेच ऑक्टोबरमध्ये होणार्‍या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आघाडी सरकारला निश्‍चितच सकारात्मक निर्णय घ्यावे लागतील. त्याचा फायदा उद्योजकांना होईल. बुटीबोरी इंडस्ट्रीजमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे मत बुटीबोरी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.