शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
3
कसली आलीय मंदी... कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
4
मान्सून उंबरठ्यावर तरी महाराष्ट्र अजून तापलेलाच! १५ शहरांत पारा ४० पार
5
'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!
6
सीबीएसईचा विद्यार्थ्यांना दिलासा; पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात
7
यूएईमध्ये अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; युद्ध भडकण्याची चिन्हे
8
‘गुलदार’ समुद्रतळाशी स्थापित करण्यास आज प्रारंभ; अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशिल रीफ आकर्षण
9
मामाला भेटायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार
10
बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव; एबीसी आयडी सादर न केल्याने विद्यापीठाचे पाऊल
11
संपादकीय: आपत्तीच्या दशकाची डायरी
12
बेजबाबदार परीक्षा यंत्रणांना लाज कशी वाटत नाही?
13
राज्यातील तब्बल ७० लाख शेतकऱ्यांच्या हाती सातबारा; सुटला तलाठ्याचा फेरा, ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपचा वाढला वापर
14
विधान परिषदेत ठाकरेंची केवळ ३१.५८% उपस्थिती ; सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर
15
मराठा समाजासाठी आमच्या एवढे काम कोणी केले नाही काेणतीही याेजना बंद नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
16
माणसांची सुट्टी! एआय स्वतःच स्वतःला देणार जन्म; 'रिकर्सिव्ह सुपरइंटेलिजन्स'ला मोठा निधी
17
केरळमध्ये सतीशन यांचा 'अल्ट्रा मॉडर्न' फॉर्म्युला! २० पैकी १४ मंत्री नवे चेहरे, आज शपथविधी होणार
18
भारत-नेदरलँड्स यांच्यात १७ करारांवर स्वाक्षऱ्या; पंतप्रधान मोदी-रॉब जेटेन यांच्यात धोरणात्मक भागीदारीबाबत चर्चा
19
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
20
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
Daily Top 2Weekly Top 5

सोन्या-चांदीची चमक उतरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:15 IST

आनंद शर्मा नागपूर : सोन्या-चांदीच्या वाढत्या किमतीवर आता ब्रेक लागला आहे. एवढेच नव्हे तर केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी ...

आनंद शर्मा

नागपूर : सोन्या-चांदीच्या वाढत्या किमतीवर आता ब्रेक लागला आहे. एवढेच नव्हे तर केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सोन्यावरील सीमाशुल्क कमी केल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या घसरणीमुळे दहा ग्रॅम शुद्ध सोने १३०० रुपये आणि किलो चांदीत ४,५०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे लग्नसमारंभ आणि अन्य विशेष प्रसंगासाठी सोने-चांदी आणि दागिन्यांच्या खरेदीची संधी आहे.

जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी कौन्सिलचे संचालक राजेश रोकडे आणि प्रदीप कोठारी म्हणाले, सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतीत मंदीचे वातावरण आहे. किमतीत सरासरी ७ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर बजेटमध्ये सीमाशुल्कात कपात करण्याच्या निर्णयाचा परिणाम सोने-चांदीच्या किमतीवर झाला आहे. भाव बरेच कमी झाले असून आणखी कमी होण्याची शक्यता नाही. अशावेळी लग्नसमारंभ आणि अन्य विशेष समारंभासाठी दागिन्यांची खरेदी आणि गुंतवणुकीची हीच वेळ आहे.

असे कमी झाले सोने-चांदीचे भाव :

तारीखसोने चांदी

१ फेब्रु. ४९,१००७३,०००

२ फेब्रु. ४८,७००७१,०००

३ फेब्रु. ४८,५००६९,०००

४ फेब्रु. ४८,०००६७,०००

५ फेब्रु. ४७,८००६७,५००