सोने पुन्हा ६७ हजारांवर, सात दिवसांत एक हजारांची वाढ

By मोरेश्वर मानापुरे | Updated: March 27, 2024 19:46 IST2024-03-27T19:45:39+5:302024-03-27T19:46:55+5:30

नागपुरात दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर पुन्हा ६७ हजार रुपयांवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम बुधवारी देशांतर्गत झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Gold again at 67 thousand, an increase of 1 thousand in seven days | सोने पुन्हा ६७ हजारांवर, सात दिवसांत एक हजारांची वाढ

सोने पुन्हा ६७ हजारांवर, सात दिवसांत एक हजारांची वाढ

नागपूर : सात दिवसानंतर नागपुरात दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर पुन्हा ६७ हजार रुपयांवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम बुधवारी देशांतर्गत झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दरवाढीच्या शक्यतेने ग्राहकांची पाऊले पुन्हा सराफा बाजाराकडे वळली आहेत. भाव ७० हजारांवर जाण्याचे तज्ज्ञांचे संकेत आहेत.

२० मार्चला शुद्ध सोन्याचे दर ६६ हजारांवर होते. २१ मार्चला खुलत्या बाजारात तब्बल १२०० रुपयांची वाढ होऊन भाव ६७,२०० रुपयांवर गेले. दुपारी ६७,३०० रुपये आणि सायंकाळी ६७,२०० रुपयांवर स्थिरावले. २२ मार्चला भाव पुन्हा घसरले. सकाळच्या सत्रात ५०० रुपयांची घसरण होऊन भाव ६६,७०० आणि सायंकाळी पुन्हा २०० रुपयांनी कमी होऊन सोने ६६,५०० रुपयांवर स्थिरावले. या दिवशी ७०० रुपयांची घसरण झाली.

२३ मार्चला भाव पुन्हा १०० रुपयांनी घसरले. २३ आणि २४ मार्चला देशात सराफा बाजारात व्यवहार झाले नाहीत. मात्र २६ मार्चला सकाळच्या सत्रात भाव २०० रुपयांनी वाढून ६६,६०० रुपये आणि सायंकाळी ६६,९०० रुपयांपर्यंत वाढले. २७ मार्चला सकाळी सोने १०० रुपयांनी कमी होऊन ६६,८०० रुपये आणि सायंकाळी २०० रुपयांनी वाढून ६७ हजारांची पातळी गाठली. २२ कॅरेट सोन्याचे भाव ६२,३०० रुपयांपर्यंत वाढले. या भावावर ३ टक्के अतिरिक्त जीएसटी आकारला जातो.

Web Title: Gold again at 67 thousand, an increase of 1 thousand in seven days