शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

गुंठेवारी विकासाचे अधिकार नासुप्रला परत द्या : विकास ठाकरे यांची विधानसभेत मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 7:49 PM

नागपूर शहरातील गुंठेवारीअंतर्गत येणाऱ्या ५७२ व १९०० ले-आऊटमधील भूखंडांचे नियमितीकरणाची प्रक्रिया पार पाडण्यास महापालिका सक्षम नाही.

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : नागपूर शहरातील गुंठेवारीअंतर्गत येणाऱ्या ५७२ व १९०० ले-आऊटमधील भूखंडांचे नियमितीकरणाची प्रक्रिया पार पाडण्यास महापालिका सक्षम नाही. त्यामुळे संबंधित अधिकार पूर्ववत नागपूर सुधार प्रन्यासला देण्यात यावे, अशी मागणी आमदार विकास ठाकरे यांनी गुरुवारी विधानसभेत केली.पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान नगर विकास खात्यावर बोलताना आ. ठाकरे म्हणाले, नागपूर शहरातील ५७२ व १९०० ले-आऊटमधील भूखंडांचे नियमितीकरण व विकास करण्याची जबाबदारी नासुप्रकडे होती. मात्र, मागील सरकारने २८ऑगस्ट २०१९ रोजी अधिसूचना काढत संबंधित अधिकार काढून घेतले व संबंधित ले-आऊट महापालिकेकडे हस्तांतरित केले. आता महापालिकेतील कर्मचाऱ्यांना या ले-आऊटच्या नियमितीकरणाची प्रक्रिया समजत नाही. त्यामुळे भूखंडांचे नियमितीकरण रखडले आहे. परिणामी नागपूर शहराच्या विकास योजनेत अडचण निर्माण झाली आहे.महापालिका स्वत:च्या अखत्यारितील कामेच बरोबर करीत नाही. अशा परिस्थितीत शहरातील एवढ्या मोठ्या ले-आऊटच्या नियमितीकरणाचा भार ते कसे स्वीकारणार, असा सवाल ठाकरे यांनी केला. यापूर्वी महापालिकेला केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत २५० बस देण्यात आल्या होत्या. त्या पूर्णत: भंगार झाल्या. त्यात १४० कोटींचा घोटाळा झाला. महापालिकेचा कारभार व्यवस्थित नसल्यामुळे आता नासुप्रची जबाबदारी महापालिकेकडे सोपवू नये, अशी सूचना करीत गुंठेवारी विकासाचे अधिकार परत नासुप्रला देण्यात यावे, अशी मागणी ठाकरे यांनी केली.

टॅग्स :Vikas Thakreविकास ठाकरेNagpur Improvement Trustनागपूर सुधार प्रन्यासvidhan sabhaविधानसभा