संत गजानन महाराज संस्थानच्या दाव्यांवर सहा महिन्यांत निर्णय द्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 16:08 IST2025-12-30T16:07:15+5:302025-12-30T16:08:48+5:30
Nagpur : भक्तांच्या सोयीकरिता मंदिर परिसर स्वच्छ व प्रशस्त करण्यासाठी संस्थानला संबंधित दुकानांची जागा हवी आहे. त्यामुळे संस्थानने दुकाने रिकामी करून घेण्यासाठी २०१६ मध्ये दिवाणी न्यायालयात दावे दाखल केले आहेत.

Give a decision on the claims of Sant Gajanan Maharaj Sansthan within six months
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानने मंदिर परिसरातील १२ भाडेकरू दुकानदारांविरुद्ध दाखल केलेले दावे सहा महिन्यांत निकाली काढा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने दिवाणी न्यायालयाला दिला आहे.
भक्तांच्या सोयीकरिता मंदिर परिसर स्वच्छ व प्रशस्त करण्यासाठी संस्थानला संबंधित दुकानांची जागा हवी आहे. त्यामुळे संस्थानने दुकाने रिकामी करून घेण्यासाठी २०१६ मध्ये दिवाणी न्यायालयात दावे दाखल केले आहेत.
दरम्यान, या दाव्यांमध्ये पुरावे नोंदणी सुरू असताना दुकानदारांनी विविध कारणांसाठी दोन अर्ज दाखल केले होते. ते अर्ज दिवाणी न्यायालयाने फेटाळून लावले. परिणामी, दुकानदारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर न्यायमूर्ती प्रफुल्ल खुबाळकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता दुकानदारांच्या सर्व याचिका नामंजूर करून वरील आदेश दिला. संस्थानतर्फे अॅड. अरुण पाटील यांनी कामकाज पाहिले.