शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयांत कूलर लावण्यासाठी ३.५८ कोटी द्या

By admin | Updated: April 30, 2015 02:26 IST

राज्यातील जिल्हा व तालुकास्तरावरील न्यायालयांच्या खोल्या, न्यायाधीशांचे कक्ष व वकिलांच्या खोल्यांमध्ये डेझर्ट कूलर लावण्यासाठी

नागपूर : राज्यातील जिल्हा व तालुकास्तरावरील न्यायालयांच्या खोल्या, न्यायाधीशांचे कक्ष व वकिलांच्या खोल्यांमध्ये डेझर्ट कूलर लावण्यासाठी येत्या आठवड्याभरात ३ कोटी ५८ लाख रुपये देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य शासनाच्या वित्त विभागाला दिलेत.१० एप्रिल रोजी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे कनिष्ठ न्यायालयांत डेझर्ट कूलर लावण्यासंदर्भातील प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करण्यात आला आहे. २१ एप्रिल रोजी पाठविण्यात आलेल्या या प्रस्तावानुसार नागपूर, अमरावती, औरंगाबाद, पुणे व नाशिक विभागातील कनिष्ठ न्यायालयांमध्ये ५५८३ डेझर्ट कूलरची गरज आहे. यावर ३ कोटी ५८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. न्यायालयाने कुलरच्या संख्येवर अविश्वास व्यक्त केल्यानंतर सरकारी वकील भारती डांगरे यांनी योग्य संख्या सांगण्यासाठी ५ मेपर्यंत वेळ देण्याची विनंती केली होती. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाने कुलर लावण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधीच वेळ केल्यामुळे त्यांची विनंती मान्य करण्यात आली नाही. हे प्रकरण आणखी लांबवल्यास उन्हाळा निघून जाईल. परिणामी १० एप्रिलचा आदेश निरर्थक ठरेल, असे मत न्यायालयाने नोंदवून सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रस्ताव विचारात घेऊन तात्पुरत्या स्वरुपात ३ कोटी ५८ लाख रुपये देण्याचे निर्देश वित्त विभागास दिलेत. तातडीने कूलर लावण्याची गरज पाहता ई-निविदा प्रक्रिया राबवू नये, अशी सूचनाही न्यायालयाने केली आहे. या प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व अनंत बदर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. पुढील सुनावणी ७ मे रोजी निश्चित करण्यात आली आहे. १० एप्रिल रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी प्रतिज्ञापत्र सादर करून राज्यात एकूण किती कूलरची गरज आहे याचे अंदाजपत्रक बोलावल्याचे सांगितले होते. त्यावर न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले होते. या प्रक्रियेसाठी ३ महिने लागल्यास यावर्षीही न्यायाधीश व वकिलांना उकाड्यातच कार्य करावे लागेल, अशा शब्दांत शासनाची कानउघाडणी करून न्यायिक अधिकाऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे शासनाचे कर्तव्य आहे असे न्यायालयाने सांगितले होते. तसेच, वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या अंदाजपत्रकानुसार तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा व सार्वजनिक बांधकाम विभागाने निधी मिळाल्यानंतर ३ आठवड्यांत डेझर्ट कुलर्स लावावेत, असे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यावर अंमलबजावणी झाली नाही.(प्रतिनिधी)