फेसबुक फ्रेंडकडून तरुणीवर अत्याचार, कॉलेजमध्ये बदनाम करण्याची धमकी
By योगेश पांडे | Updated: March 20, 2024 16:32 IST2024-03-20T16:32:03+5:302024-03-20T16:32:52+5:30
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

फेसबुक फ्रेंडकडून तरुणीवर अत्याचार, कॉलेजमध्ये बदनाम करण्याची धमकी
योगेश पांडे, नागपूर : फेसबुक फ्रेंडने एका तरुणीवर अत्याचार केला व तिने लग्नासाठी विचारणा केली असता तिच्या कॉलेजमध्ये बदनाम करण्याची धमकी दिली. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
अश्विन चिंचुलकर (३०, दत्तवाडी) असे आरोपीचे नाव आहे. अश्विनची फेसबुकच्या माध्यमातून एका २३ वर्षीय तरुणीशी ओळखी झाली. त्याने तिच्याशी मैत्री केली व तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. १ ऑगस्ट २०२३ रोजी त्याने तिला एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये नेले व लवकरच लग्न करू असे म्हणत तिच्यावर अत्याचार केला. ३१ डिसेंबरपर्यंत असा प्रकार अनेकदा झाला. तिने त्याला लग्नाबाबत विचारले असता त्याने नकार दिला. तसेच तिच्या कॉलेजमध्ये बदनाम करण्याची धमकी दिली. अखेर तरुणीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अश्विनविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.