शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

गिरधारीलाल अग्रवालचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By admin | Updated: December 26, 2015 03:49 IST

लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खंडणीप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. तरारे यांच्या न्यायालयाने

न्यायालय : खंडणी प्रकरणनागपूर : लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खंडणीप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. तरारे यांच्या न्यायालयाने आरोपी वर्धमाननगर येथील रहिवासी गिरधारीलाल अग्रवाल याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. स्माल फॅक्टरी एरिया येथील रहिवासी संतोष ऊर्फ बंटी रामपाल शाहू याच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी गिरधारीलाल अग्रवाल आणि अन्य लोकांविरुद्ध भादंविच्या ३८४, ३८६, १४३, शस्त्र कायद्याच्या ३/२५ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. तक्रारकर्त्यानुसार तो सप्टेंबर २०१५ च्या दुसऱ्या आठवड्यात आपल्या दुकानाकडे जात असताना गिरधारीलाल आणि अन्य लोकांनी त्याला थांबविले. त्याला एमएच-३१-एई-०६०६ क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसविले. रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून आणि जीवे मारण्याची धमकी देऊन दरमहा ५० हजाराच्या खंडणीची मागणी केली. गिरधारीलालसोबत असलेल्या मुकेश शाहू याने रिव्हॉल्व्हर लावून १ लाख २५ हजार रुपये किमतीची गळ्यातील सोन्याची चेन आणि खिशातील २० हजार रुपये रोख हिसकावून घेतले. १ आॅक्टोबर २०१५ रोजी गिरधारीलाल याला ५० हजाराची खंडणी दिली, असा आरोपही फिर्यादीने केला होता. आरोपी गिरधारीलाल याच्यावतीने युक्तिवाद करताना अ‍ॅड. चेतन ठाकूर यांनी न्यायालयाला सांगितले की, गिरधारीलाल हा संतोष शाहू याच्याविरुद्ध दाखल एका फौजदारी प्रकरणात साक्षीदार होता. फिर्यादीने गुन्हा नेमका कोणत्या दिवशी घडला, याचा उल्लेख केलेला नाही. मुख्य आरोपी मुकेश शाहू याला अटक झालेली आहे. आरोपी गिरधारीलालकडून पोलिसांना काहीही जप्त करणे नाही. त्यामुळे आरोपीला जामीन मंजूर करण्यात यावा. सरकार पक्षाने जामिनास विरोध केला. तो प्रथमदर्शनी गुन्ह्यात सहभागी असल्याचे दिसते, त्यामुळे पोलीस कोठडीत आरोपीची विचारपूस आवश्यक आहे. ७० हजार रुपये रोख आणि सोन्याची चेन अद्यापही जप्त झालेली नाही. प्रकरण गंभीर आहे. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून आरोपी गिरधारीलाल अग्रवाल याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील प्रशांत साखरे, फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. विनायक डोंगरे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)