शहरं
Join us  
Trending Stories
1
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
2
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
5
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
6
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
7
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
8
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
9
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
10
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
11
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
12
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
13
Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यात 'गुगल' दाखवणार गर्दीतून वाट; अडीच हजार CCTV ची शहरावर नजर
14
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
15
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
16
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
17
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
18
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
19
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
20
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस ठरले महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित ठिकाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2022 13:37 IST

आरएसपीएमच्या उच्चपातळीमुळे घुग्गुसचे रहिवासी हृदयविकाराच्या धक्क्याने मरत आहेत. बहुतेकांना किडनी, स्तन, फुफ्फुस, हृदय, डोळे आणि त्वचेच्या आजारांनी ग्रासले आहे.

ठळक मुद्देप्रदूषणामुळे स्थानिक अनेक आजारांच्या विळख्यातसरकारचे अक्षम्य दुर्लक्ष

आशिष राॅय

नागपूर : एनर्जी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (टेरी)च्या २०१८-१९च्या अहवालानुसार चंद्रपूरजवळील घुग्गुस हे ‘महाराष्ट्रातील सर्वांत प्रदूषित ठिकाण’ असल्याचे आढळून आले आहे. येथील वातावरणात धुलीकणांची (आरएसपीएम) पातळी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे निर्धारीत मर्यादेच्या तिपटीवर पाेहोचली असून वायू प्रदूषणामुळे लाेक माशांसारखे मरत आहेत. अशी गंभीर परिस्थिती असताना उपाययोजनांबाबत सरकार उदासीन आहे आणि जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी)चे अधिकारी गाढ झोपेत आहेत.

टेरीच्या अहवालानुसार रिस्पायबल सस्पेंडेट पार्टिक्युलेट मॅटर (आरएसपीएम)ची सरासरी पातळी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने निर्धारित केलेल्या कमाल मर्यादेच्या तिप्पट आहे. ६० मायक्रोग्रॅम घनमीटर या मर्यादेच्या तुलनेत २०१८-१९ मध्ये ते १७५ म्युग्रॅम् / घनमीटर एवढे हाेते. २०१७ - १८ साली ते २९८ म्युग्रॅम / घनमीटरपर्यंत वाढले हाेते. आरएसपीएमच्या उच्चपातळीमुळे घुग्गुसचे रहिवासी हृदयविकाराच्या धक्क्याने मरत आहेत. बहुतेकांना किडनी, स्तन, फुफ्फुस, हृदय, डोळे आणि त्वचेच्या आजारांनी ग्रासले आहे. उदरनिर्वाहासाठी शहरात राहण्यास भाग पडलेल्या अनेकांनी आपली कुटुंबे नागपूर किंवा इतर ठिकाणी स्थलांतरित केली असल्याचे आम आदमी पक्षाचे नेते अमित बोरकर यांनी सांगितले. 

घुग्गुसचे डॉ. प्रदीप यादव यांच्या मते, शहरात त्वचेची अॅलर्जी, दमा आणि ह्रदयाचे आजार भयंकर वाढले आहेत. येथे सेंट्रिझीन या अँटी-अॅलर्जिक औषधाची विक्री खूप जास्त आहे. घुग्गुसमध्ये स्पंज आयर्न, सिमेंट आणि कोळशाचा घातक संयोग आहे. लॉयड्स मेटलचा स्पंज आयर्न प्लँट, एसीसीचा सिमेंट प्लँट आणि डब्ल्यूसीएलच्या कोळशाच्या खाणी शहराजवळ आहेत. स्पंज आयर्न प्लँट्स हे सर्वांत प्रदूषित उद्योगांपैकी एक असून, अनेक देश आणि भारतीय राज्यांनी त्यांच्यावर निर्बंध लादले आहेत. घुग्गुसमध्ये मात्र हे उद्याेग हवेत मुक्तपणे विष टाकत आहेत.गेल्या ३० वर्षांपासून प्रदूषणाविरोधात लढा देणारे पर्यावरण कार्यकर्ते विनेश कलवाल यांनी सांगितले की, लॉयड्स प्लँटमधून लोहाचे बारीक कण हवेत उत्सर्जित हाेतात व मानवी फुफ्फुसात स्थिरावत रक्तप्रवाहात प्रवेश करतात. तिशीतले तरुण ह्रदयविकाराच्या आजाराने त्रस्त झाले आहेत, तर २० वर्षांच्या तरुणांना कर्करोग होत आहे. घुग्गुसमधील प्रत्येक तिसऱ्या घरात कर्करोगाचा रुग्ण असून, लवकरच प्रत्येक घरात एक रुग्ण असेल, कलवाल म्हणाले.

प्रदूषणाचे परिणाम

- अवेळी मृत्यू

- श्वसनाचे तीव्र आजार

- वनस्पतीच्या वाढीवर परिणाम

२०१८-१९ मध्ये प्रदूषणाचा स्तर

 

                                    एसओटू  -  एनओएक्स  -  आरएसपीएम

मर्यादा                            ५०                 ४०             ६०

घुग्गुसमध्ये स्तर    -            ४                 २९             १७५

टॅग्स :pollutionप्रदूषणchandrapur-acचंद्रपूरenvironmentपर्यावरण