शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

भुते यांचे कारागृहातील वास्तव्य वाढणार

By admin | Updated: January 9, 2016 03:28 IST

ठकबाज वासनकर कुटुंबाला मदत केल्याप्रकरणी कारागृहात असलेले ताजश्री समूहाचे सर्वेसर्वा अविनाश रमेश भुते यांच्या जामीन अर्जावर ...

उत्तर देण्यास सरकार पक्षाने मागितला अवधी नागपूर : ठकबाज वासनकर कुटुंबाला मदत केल्याप्रकरणी कारागृहात असलेले ताजश्री समूहाचे सर्वेसर्वा अविनाश रमेश भुते यांच्या जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्यासाठी सरकार पक्षाने एमपीआयडी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयाला सोमवारपर्यंत अवधी मागितल्याने भुते यांचे कारागृहातील वास्तव्य वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भुते यांच्या ताजश्री समूहाच्या बँक खात्यात वासनकर यांची ९ कोटी १९ लाख ८५ हजार रुपयांची रक्कम आढळून आली होती. ही रक्कम तपास यंत्रणेला जप्त करता येऊ नये, म्हणून भुते यांनी वासनकर यांना अवैधरीत्या मदत करण्याच्या हेतूने बनावट दस्तऐवज तयार करून न्यायालय, तपास यंत्रणा आणि सरकारची फसवणूक केली, अशा आरोपावरून त्यांच्याविरुद्ध भांदविच्या १०९ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ४ जानेवारी रोजी आर्थिक पथकाने भुते यांना अटक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलीस कोठडी रिमांडसाठी न्यायालयात हजर केले होते. बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. अक्षय नाईक आणि अ‍ॅड. प्रदेश रणदिवे यांनी भुते यांचा जामीन अर्ज न्यायालयात सादर केला होता. अर्जावर आज शुक्रवारी उत्तर दाखल करण्याचा सरकार पक्षाला आदेश दिला होता. तपास अधिकारी सुधाकर ढाणे यांनी उच्च न्यायालयात व्यस्त असल्याने सरकार पक्षामार्फत उत्तर दाखल करण्यास दोन दिवसांचा कालावधी मागितला. तो न्यायालयाने मंजूर केला. सरकार पक्षातर्फे न्यायालयात अतिरिक्त सरकारी वकील कल्पना पांडे यांनी बाजू मांडली. दरम्यान पीडित गुंतवणूकदारांच्या वतीने अ‍ॅड. बी. एम. करडे यांनी न्यायालयात अर्ज दाखल करून मूळ रकमेची सहापट रक्कम न्यायालयात जमा करण्याचे भुते यांना आदेश देण्यात यावे, अशी मागणी केली. गुंतवणूकदारांनी गोल्डन योजने अंतर्गत २०११ पासून ही गुंतवणूक केलेली आहे. (प्रतिनिधी)