पतीच्या डोक्यात संशयाचे भूत, पत्नीच्या मानलेल्या भावालाच ठार मारण्याचा प्रयत्न

By योगेश पांडे | Updated: July 14, 2023 17:23 IST2023-07-14T17:22:13+5:302023-07-14T17:23:34+5:30

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Ghost of suspicion in husband's head, attempt to kill his wife's supposed brother | पतीच्या डोक्यात संशयाचे भूत, पत्नीच्या मानलेल्या भावालाच ठार मारण्याचा प्रयत्न

पतीच्या डोक्यात संशयाचे भूत, पत्नीच्या मानलेल्या भावालाच ठार मारण्याचा प्रयत्न

नागपूर : चारित्र्याच्या संशयावरून एका आरोपीने पत्नीच्या मानलेल्या भावालाच चाकूने वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

राजू गिल्हारी कुंमरे (४०, ईसासनी, एमआयडीसी) असे आरोपीचे नाव आहे. त्याची पत्नी रवी लक्ष्मण बरमिया (२६, ईसासनी) याला भाऊ मानते. दोघेही भावाबहिणीप्रमाणे एकमेकांशी बोलायचे. मात्र आरोपी राजू याला मात्र दोघांवरही संशय यायचा. त्याला संशयाच्या भूताने इतके झपाटले होते की त्याने रवीला मारण्याचा कट रचला. गुरुवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास रवी हनुमान मंदिराजवळ फोनवर बोलत उभा असताना राजू मागून आला व त्याने रवीच्या मानेवर धारदार चाकूने वार करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रवी जखमी झाल्यावर राजू तेथून पळून गेला. वस्तीतील लोकांनी रवीला खासगी इस्पितळात दाखल केले. रवीच्या तक्रारीवरून राजूविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Ghost of suspicion in husband's head, attempt to kill his wife's supposed brother