नागपूरच्या लॉ कॉलेज चौकात गारमेंट शो रुमला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 23:27 IST2018-06-16T23:27:09+5:302018-06-16T23:27:09+5:30
अमरावती रोडवरील लॉ कॉलेज चौकातील जगत टॉवर येथील पँटलून गारमेंट शोरुमला शुक्रवारी रात्री उशीरा भीषण आग लागली. या आगीत गारमेंट शो रुममधील लाखो रुपयांचे कपडे आणि इतर साहित्य जळून खाक झाले. रात्री १.३० वाजता सुरक्षा रक्षकाला अलार्म वाजल्यामुळे आगीची माहिती मिळाली, अन्यथा आगीमुळे मोठे नुकसान झाले असते.

नागपूरच्या लॉ कॉलेज चौकात गारमेंट शो रुमला आग
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अमरावती रोडवरील लॉ कॉलेज चौकातील जगत टॉवर येथील पँटलून गारमेंट शोरुमला शुक्रवारी रात्री उशीरा भीषण आग लागली. या आगीत गारमेंट शो रुममधील लाखो रुपयांचे कपडे आणि इतर साहित्य जळून खाक झाले. रात्री १.३० वाजता सुरक्षा रक्षकाला अलार्म वाजल्यामुळे आगीची माहिती मिळाली, अन्यथा आगीमुळे मोठे नुकसान झाले असते.
मिळालेल्या माहितीनुसार जगत टॉवर येथील शोरुमच्या रेडिमेड कपड्यांच्या शोरुम मधुन धुर निघताना दिसला. त्यानंतर त्वरीत अलार्म वाजल्यामुळे सुरक्षा रक्षकांना आग लागल्याची माहिती मिळाली. त्यांनी घटनेची सूचना शो रुमचे व्यवस्थापक राजेश केरवटकर आणि अग्निशमन विभागाला दिली. ही आग वाढल्यामुळे शो रुममधील गारमेंट सेक्शनही आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. अर्ध्या तासात आग टॉवरच्या वरच्या माळ्यावरील शो रुमकडे पसरली. आगीची भीषणता पाहून अग्निशमन विभागाच्या ९ गाड्या बोलविण्यात आल्या. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते आगीत जवळपास ३५ लाखांचे कपडे जळून खाक झाले आहेत. परंतु आगीवर त्वरीत नियंत्रण मिळविल्यामुळे करोडो रुपयांचा माल खाक होण्यापासून वाचविता आला. आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.