शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

coronavirus; कचऱ्यामुळे आरोग्याला फास; आता बास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 12:23 PM

नागपूर शहरात दररोज ११०० ते ११५० मेट्रिक टन कचरा निघतो. यासाठी आठ हजार कर्मचारी गोळा करण्यासाठी लागतात. त्यांच्यावर शंभराहून अधिक अधिकारी लक्ष ठेवतात. ५२५ लहान-मोठी वाहने हा कचरा वाहून नेतात, तरीही शहरात कचरा पडलेला असतोच.

ठळक मुद्देरोजचा कचरा ११५० टन‘कचरा फेका कुठेही’ बंद होण्याची गरजविल्हेवाट लावण्यासाठी वर्षाला ७२ कोटी येतो खर्च

गणेश हूड ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कचऱ्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. कचऱ्यातील जंतू वातावरणात पसरून आजार निर्माण करतात. कचरा दुर्गंधी पसरवतो, सौंदर्य बिघडवतो. असे सगळे लहानपणापासून आपण शिकलेलो असतानाही कचरा तयार करायचा व तो कुठेही कसाही फेकून द्यायचा काही थांबायला तयार नाही. कोरोनासारख्या साथीच्या पार्श्वभूमीवर हे सगळे बंद होण्याची गरज आहे.शहरात दररोज ११०० ते ११५० मेट्रिक टन कचरा निघतो. यासाठी आठ हजार कर्मचारी गोळा करण्यासाठी लागतात. त्यांच्यावर शंभराहून अधिक अधिकारी लक्ष ठेवतात. ५२५ लहान-मोठी वाहने हा कचरा वाहून नेतात, तरीही शहरात कचरा पडलेला असतोच.कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका वर्षाला ७२ कोटी रुपये खर्च करते. तरीही कचरा रोज तयार होतच असतो व दुर्गंधी पसरवीत असतो. शहरातील कचरा भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे साठविला जातो. यातील १५० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते.या कचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्माण केले जाते. उर्वरित १००० ते १०५० मेट्रिक टन कचरा तसाच साठविला जातो. त्यावर बायोमायनिंग प्रक्रिया करण्याचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे. भांडेवाडी येथे साठून असलेल्या हजारो टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी बायोमायनिंग प्रकल्प हाती घेतला आहे. यावर काही कोटी खर्च येणार आहे. मनपाने स्वच्छ सर्वेक्षणासाठी शहर कंटेनर मुक्त केले आहे. नवीन दोन कंपन्यांची कचरा संकलनासाठी नियुक्ती केली आहे.

नागरिकही तेवढेच दोषी...इतका कचरा निर्माण होतोच कसा, या गहन प्रश्नासोबतच ‘तो कुठेही कसाही टाकला कसा जातो’? याची उकल मनपा प्रशासनाला होत नाही. याचे उत्तर त्यांच्या व्यवस्थेत दोष आहेतच. याचबरोबर नागरिकही तेवढेच दोषी आहेत, हेही तितकेच खरे. सार्वजनिक ठिकाणी मोकळी जागा दिसली की घरातील कचरा तेथे आणून टाकला जातो. कचरा तयार होणारच, हे समजल्यावर त्याची विल्हेवाटही व्यवस्थित लावायला हवी. हेही समजायला हवे, मात्र तसे होताना दिसत नाही. त्यामुळेच महापालिकेने कितीही प्रयत्न केले तरीही कचºयाची समस्या काही संपायला तयार नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसGarbage Disposal Issueकचरा प्रश्न