नागपुरातील नरसाळ्यात गँगवॉर : दोन्ही गटाविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 22:56 IST2020-05-20T22:54:36+5:302020-05-20T22:56:36+5:30
हुडकेश्वरमधील नरसाळा परिसरात गँगवॉर भडकले. मंगळवारी रात्री दोन्ही गटांनी एकमेकांवर शस्त्रांनी हल्ला केला. लॉकडाऊनदरम्यान तीन तास चाललेल्या या मारहाणीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

नागपुरातील नरसाळ्यात गँगवॉर : दोन्ही गटाविरुद्ध गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हुडकेश्वरमधील नरसाळा परिसरात गँगवॉर भडकले. मंगळवारी रात्री दोन्ही गटांनी एकमेकांवर शस्त्रांनी हल्ला केला. लॉकडाऊनदरम्यान तीन तास चाललेल्या या मारहाणीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
२४ वर्षीय देवानंद मेश्राम याला रात्री ८ वाजता त्याचा मित्र अमित यादवने फोन करून मौर्या लॉनजवळ बोलावले होते. देवानंद तिथे त्याचा मित्र रोशन चौगडेसोबत पोहोचला. त्याचवेळी सुजीत चव्हाणने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. यात देवानंद जखमी झाला. या हल्ल्यामुळे देवानंदचे साथीदार संतापले. रात्री ११.४५ वाजता अमित यादवने आपल्या साथीदारांसह श्रीयसनगर येथील सुजीत चव्हाणच्या घरावर हल्ला केला. तलवार आणि दारूच्या बॉटलने घरात तोडफोड केली. सुजीतचे वडील बाहेरच बसले होते. हल्लेखोर सुजीतला धडा शिकवण्यासाठी आले होते. परंतु तो घरी न सापडल्याने कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन फरार झाले. या घटनेमुळे नरसाळा परिसरात गँगवॉर भडकण्याची शंका निर्माण झाली आहे.