शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
3
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
4
"मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
5
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
6
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
7
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
8
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
9
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
10
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
12
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
13
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
15
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
16
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
17
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
18
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
20
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?

नागपुरातील गँगस्टर आंबेकर आणि गौसला कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 11:53 PM

नागपूरच्या गुन्हेगारी जगताचा म्होरक्या गँगस्टर संतोष आंबेकर आणि एकाच दिवशी पाच ठिकाणी फायरिंग करून पाच वर्षांपूर्वी नागपुरात खळबळ उडवून देणारा कुख्यात गुंड राजा गौस या दोघांना कोरोनाने जखडले आहे. कारागृहातील इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

ठळक मुद्देकारागृहातील इस्पितळात उपचार : प्रकृती ठीक असल्याचा दावा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नागपूरच्या गुन्हेगारी जगताचा म्होरक्या गँगस्टर संतोष आंबेकर आणि एकाच दिवशी पाच ठिकाणी फायरिंग करून पाच वर्षांपूर्वी नागपुरात खळबळ उडवून देणारा कुख्यात गुंड राजा गौस या दोघांना कोरोनाने जखडले आहे. कारागृहातील इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू आहे.कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर अधिकारी, कर्मचारीच नव्हे कैद्यांनाही कोरोनाने विळखा घातला. तब्बल २१९ जणांना कोरोनाची बाधा झाली. त्याच अनेक खतरनाक गुंडांचाही समावेश आहे. नागपूरच्या गुन्हेगारी जगताचा प्रमुख समजला जाणारा गँगस्टर संतोष आंबेकर यालाही कोरोनाची बाधा झाली. त्याच्यानंतर राजा गौसला कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे आठ दिवसांपूर्वी लक्षात आले. गौसला लक्षणे तीव्र स्वरूपाची असल्यामुळे मेयोत त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि त्याच दिवशी त्याला कारागृहात आणण्यात आले. या दोघांवरही कारागृहातील इस्पितळात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती बरी असल्याची माहिती कारागृहाचे अधीक्षक अनुप कुमरे यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याjailतुरुंगnagpurनागपूर