नागपुरात दारू पाजून विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:06 IST2019-08-01T00:05:25+5:302019-08-01T00:06:15+5:30

महाविद्यालयीन विद्यार्थिनीस जबरदस्तीने दारू पाजून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची घटना बेलतरोडी पोलीस ठाण्यांतर्गत घडली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

Gang rape on student by giving liquor in Nagpur | नागपुरात दारू पाजून विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार

नागपुरात दारू पाजून विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार

ठळक मुद्देदोन आरोपींना अटक : बेलतरोडी परिसरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाविद्यालयीन विद्यार्थिनीस जबरदस्तीने दारू पाजून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची घटना बेलतरोडी पोलीस ठाण्यांतर्गत घडली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
निखील सोमकुवर (२५) आणि वतन गोमकाळे (२५), अशी आरोपींची नावे आहेत. पीडित १८ वर्षीय युवती बी. कॉम. पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी आहे. ती आई आणि लहान भावासोबत राहते. घटनेचा सूत्रधार निखील सोमकुवर आहे. तो विद्यार्थिनीच्या आईच्या नातेवाईकाच्या ओळखीचा आहे. त्यामुळे पीडित विद्यार्थिनीही त्यास ओळखते. निखील पूर्वी मुंबईत काम करीत होता. काही दिवसांपासून तो नागपूरला आला आहे. खासगी कंपनीत तो मॅनेजर आहे. तीन महिन्यापासून त्याची विद्यार्थिनीशी फेसबुकवर फ्रेंडशिप आहे. यामुळे त्यांच्यात मैत्री वाढली. विद्यार्थिनीची आई सकाळी ड्युटीवर तर भाऊ शाळेत जातो. १७ जुलैला निखील विद्यार्थिनीच्या घरी आला. तो तिचा हात पकडून बेडरुममध्ये घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. विद्यार्थिनीने ही घटना कुणाला न सांगितल्याने निखीलची हिंमत वाढली. विद्यार्थिनीने दिलेल्या माहितीनुसार, १९ जुलैला दुपारी १.३० वाजता निखील आपला मित्र वतन गोमकाळे याच्यासोबत घरी आला. त्याच्याजवळ बीअरची बाटली होती. त्यांनी बीअर घेतली. विद्यार्थिनीलाही जबरदस्तीने बीअर पाजली. त्यानंतर दोघांनीही तिच्यावर अत्याचार केला. ही बाब कुणाला सांगितल्यास भावासह जीवे मारण्याची धमकी देऊन ते फरार झाले. काही दिवसांपासून विद्यार्थिनीच्या आईला मुलीच्या वागणुकीवर संशय आला. तिने नातेवाईकांच्या मदतीने मुलीची चौकशी केली. विद्यार्थिनीने घडलेली घटना सांगितल्यानंतर बेलतरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. पोलीस आरोपींची चौकशी करून घटनेची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Web Title: Gang rape on student by giving liquor in Nagpur