शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

गणेशपेठ ठाण्याचा एपीआय जेरबंद

By admin | Updated: July 3, 2015 02:48 IST

एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना गणेशपेठ पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक (एपीआय) लक्ष्मण माधव केंद्रे याला एसीबीच्या पथकाने जेरबंद केले.

एक लाखाची लाच : एसीबीने केली कारवाई नागपूर : एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना गणेशपेठ पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक (एपीआय) लक्ष्मण माधव केंद्रे याला एसीबीच्या पथकाने जेरबंद केले. गुरुवारी रात्री गांधीसागर तलावाजवळ झालेल्या या कारवाईमुळे गणेशपेठ ठाण्यासह पोलीस यंत्रणेत प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. नवविवाहित प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या आणि नंतर तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या शेख शाहरूख शेख रहेमान (वय २५) या हंसापुरीतील तरुणाला २९ जूनला गणेशपेठ पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर अपहरण आणि बलात्काराचा आरोप लावून पोलिसांनी त्याचा पीसीआरही मिळवला. मुलाला त्रास होऊ नये म्हणून शाहरूखचे वडील शेख रहेमान शेख सुलेमान गणेशपेठ पोलीस ठाण्यात गेले. त्यांना एपीआय केंद्रेला भेटा, असे सांगण्यात आले. केंद्रेशी चर्चा केली असता शाहरुखला घरचे खाणेपिणे आणि इतर सुविधा देण्यासोबतच कोणतीही मारहाण करणार नाही, असे सांगून केंद्रेने दीड लाख रुपयांची लाच मागितली. रक्कम जास्त असल्याचे सांगून ती देण्यास नकार दिल्यामुळे शाहरुखची पिटाई करण्याची भीती दाखवण्यात आली. त्यामुळे रहेमान यांनी लाच देण्याची तयारी दाखवून एसीबीकडे धाव घेतली. शहानिशा झाल्यानंतर एसीबीचे अधीक्षक राजीव जैन यांनी सापळ्याचे आदेश दिले. त्यानुसार, उपअधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. केंद्रेने रक्कम स्वीकारताच ाथकाने मुसक्या बांधल्या.तो ‘साहेब‘ कोण ?एसीबीने केंद्रेच्या मुसक्या बांधल्याची वार्ता कळताच गणेशपेठ पोलीस ठाण्यात खळबळ निर्माण झाली. दरम्यान, केंद्रेने लाच मागण्यापूर्वी आणि स्वीकारल्यानंतर ‘साहेबांना द्यायचे आहे‘ अशी मखलाशी केली होती, असे समजते. हे ‘साहेब‘ कोण, त्याचा एसीबीचे अधिकारी तपास करीत आहेत. दरम्यान, केंद्रेला पकडल्यानंतर एसीबीच्या पथकाने त्याच्या निवासस्थानी झडती सुरू केली. त्यात काय मिळाले, ते स्पष्ट होऊ शकले नाही.