शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

Ganesh Festival 2018 : नागपुरात  कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जनाला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 9:37 PM

जलप्रदूषण टाळण्यासाठी नागपूर महापालिकेने घेतलेल्या पुढाकाराला गणेशभक्त चांगला प्रतिसाद देत आहेत. शहरात ठिकठिकाणी लावलेल्या कृत्रिम तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येत आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाच्या दृष्टीने महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे.

ठळक मुद्देअखेरच्या दिवशी देणार स्वयंसेवी संस्था सेवा 

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जलप्रदूषण टाळण्यासाठी नागपूर महापालिकेने घेतलेल्या पुढाकाराला गणेशभक्त चांगला प्रतिसाद देत आहेत. शहरात ठिकठिकाणी लावलेल्या कृत्रिम तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येत आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाच्या दृष्टीने महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे.महापालिकेच्या दहाही झोन मिळून सुमारे २५० कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. गांधीसागर, सक्करदरा तलाव आणि सोनेगाव तलाव येथे गणपती विसर्जनाला पूर्णपणे बंदी असली तरी या ठिकाणी मोठे कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहे. या तलावांमध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणात घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे.फुटाळ्यावर ग्रीन व्हिजीलची सेवा- फुटाळा तलावावर वायुसेनेच्या दिशेने होत असलेले गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच व्हावे यासाठी ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे स्वयंसेवक दक्ष आहेत. अगदी पहिल्या दिवसापासूनच ते या तलावावर सेवा देत आहे. मूर्ती विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांना कृत्रिम तलावात गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी विनंती करीत आहेत. निर्माल्य कलशातच निर्माल्य टाकण्यासाठी त्यांचा आग्रह आहे. ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार फुटाळा तलावाच्या वायुसेनानगरच्या दिशेने ठेवलेल्या कृत्रिम टँकमध्ये शुक्रवारपर्यंत एकूण १७३४ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. याच ठिकाणी १८ टन निर्माल्य संकलन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.स्वयंसेवी संस्था देणार सेवा शहरातील विविध पर्यावरणप्रेमी आणि स्वयंसेवी संस्था मनपाच्या खांद्याला खांदा लावून अखेरच्या दिवशी विसर्जन मिरवणूकसमयी सेवा देणार आहे. या स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक विविध ठिकाणी भाविकांना मार्गदर्शन करतील. निर्माल्य कलशात निर्माल्य दान करण्यासाठी आणि कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन करण्यासाठी विनंती करतील. या स्वयंसेवकांना सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार यांनी केले आहे.पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सहकार्य करा : महापौरमहापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पूवीपासूनच जनजागृती केली आहे. जलप्रदूषण होऊ नये, यासाठी पूर्ण प्रयत्न आहेत. नागरिकांनी कृत्रिम तलावातच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे आणि निर्माल्य कलशातच निर्माल्य दान करावे, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले आहे. 

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनnagpurनागपूर