नागपुरात होस्टेलमध्ये सुरू होता जुगार अड्डा : सदर पोलिसांचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 01:00 IST2018-11-20T00:57:42+5:302018-11-20T01:00:07+5:30
नवीन मंगळवारीतील एका होस्टेलमध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर सदर पोलिसांनी रविवारी रात्री छापा घालून होस्टेलच्या संचालकासह सहा जुगाऱ्यांना पकडले. त्यांच्याकडून रोख आणि साहित्यासह २ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नागपुरात होस्टेलमध्ये सुरू होता जुगार अड्डा : सदर पोलिसांचा छापा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवीन मंगळवारीतील एका होस्टेलमध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर सदर पोलिसांनी रविवारी रात्री छापा घालून होस्टेलच्या संचालकासह सहा जुगाऱ्यांना पकडले. त्यांच्याकडून रोख आणि साहित्यासह २ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मंगळवारी बाजारात गुप्ता बॉयज होस्टेल आहे. येथे संचालक आकाश गुप्ता अनेक दिवसांपासून जुगार अड्डा चालवतो, अशी माहिती सदरचे ठाणेदार सुनील बोंडे यांना मिळाली. त्यावरून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना तेथे रविवारी रात्री छापा घालण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पोलीस पथकाने होस्टेलमध्ये छापा घालून आरोपी आकाश घनश्याम गुप्ता, रोशन अशोक बनसोडे, मोहम्मद जिमल अजगर अली, किसन अशोक बेंदरे, रोहन रामलखन कनोजिया आणि अजय तुुलसी कनोजिया यांना जुगार खेळताना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून रोख, मोबाईल आणि साहित्यासह २ लाख ३२ हजारांचा ऐवज जप्त केला. होस्टेलमध्ये चक्क जुगार अड्डा चालविला जात असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
ही कारवाई परिमंडळ-२ चे उपायुक्त चिन्मय पंडित, ठाणेदार सुनील बोंडे, वरिष्ठ निरीक्षक महेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मयूर चौरसिया, हवालदार विनोद तिवारी, नायक सुशांत सोळंके, सुधीर मेश्राम, संदीप पांडे, नीलेश शेंदरे आदींनी बजावली.