शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL 2026 Playoffs Race : स्क्रिप्ट भारी की, मॅच? १६ गुण कमावणाऱ्यांसाठीही पोटात गोळा आणणारा ट्विस्ट
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
7
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
8
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
9
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
11
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
12
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
13
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
14
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
15
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
16
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
17
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
18
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
19
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
20
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अबकी बार गडकरी..

By admin | Updated: May 17, 2014 01:55 IST

भारतीय जनता पार्टीचा विजय असो’ ‘नितीनजी गडकरी आगे बढो..’, अशा घोषणा देत, फटाक्यांच्या आतषबाजीत, ढोलताशांचा गजरात, गुलाल उधळीत, पेढे भरवत नागपूर लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांची विजयी ...

विजयोत्सव : कार्यकर्त्यांचा जल्लोष

नागपूर : ‘भारतीय जनता पार्टीचा विजय असो’ ‘नितीनजी गडकरी आगे बढो..’, अशा घोषणा देत, फटाक्यांच्या आतषबाजीत, ढोलताशांचा गजरात, गुलाल उधळीत, पेढे भरवत नागपूर लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांची विजयी रॅली आज शुक्रवारी मोठय़ा जल्लोषात निघाली. भाजपाचे झेंडे घेऊन हजारो कार्यकर्ते दुचाकीवर स्वार होते. त्यांचा उत्साह अवर्णनीय होता. ‘नयी सोच, नयी उम्मीद’ लिहिलेल्या खुल्या जीपमधून गडकरी सर्वांचे हात जोडून आभार मानत होते. विजयाची खूण दाखवित होते. ‘अबकी बार मोदी सरकार..जय-जय-जय-जय-जय हो , जय हो या गीतावर’ तरुण बेधुंद नाचत होते. या चौकात भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी गडकरी यांचे आरती ओवाळून मिठाईचे वाटप केले.

सायंकाळी ५ वाजता कळमना चौकातून रॅलीला सुरुवात झाली. गडकरी यांच्या खुल्या जीपमध्ये आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. सुधाकर देशमुख, महापौर प्रा. अनिल सोले, माजी महापौर अर्चना डेहनकर सहभागी होत्या. आ. खोपडे हे ध्वनिक्षेपकांमधून लोकांचे आभार मानत होते. रॅलीच्या मार्गावर विविध संस्था, मंडळे, नगरसेवक, कार्यकर्ते रॅलीच्या प्रतीक्षेत होते. रॅली जवळ येताच फटाक्यांची आतषबाजी, पुष्पांचा वर्षाव आणि गुलाल उधळीत रॅलीचे स्वागत होत होते. ठिकठिकाणी गडकरींना ओवळल्या जात होते, पेढे भरवण्यात येत होते. कळमना चौकातून रॅली वर्धमानगर चौकात येताच एकच जल्लोष झाला. येथे पक्षाकडून सर्वांना लहान मोठी झेंडे, दुप्पटे वितरीत करण्यात आले. हजारो कार्यकर्त्यांच्या हातात झेंडे आल्याने रॅलीचे रूपच पालटले. कार्यकर्त्यांचा उत्साहाला उधाण आले.

रॅलीमध्ये महिलांची, ज्येष्ठांची उपस्थिती लक्षणीय होती. चौकाचौकात सामान्य जनताही यात सहभागी होऊ लागली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोक गर्दी करून गडकरींना शुभेच्छा देत होते. काही जण मोबाईलमध्ये हा क्षण कैद करीत होते. वर्धमाननगर चौकातून रॅली हरीहर मंदिर रोडने लकडगंज चौकात आली. येथे गुलाबाच्या पाकळ्यांनी रॅलीचे जोरदार स्वागत झाले. चौकात लावलेला डीजेमधील

पुढे ही रॅली सतरंजीपुरा चौकातून, क्वेटा कॉलनी चौकात आली. येथे क्वेटा नवरात्र महोत्सव समितीच्यावतीने पुष्पांचा वर्षाव करण्यात आला. लाडूचे वाटप करण्यात आले. येथून ही रॅली टेलिफोन एक्सचेंज चौक होत, सीए रोडने गंगाबाई घाट चौक होऊन बडकस चौकात आली. (प्रतिनिधी)

वर्धमाननगर मार्गावर

एक मूक संवाद

वर्धमाननगर चौकातून रॅली मार्गक्रमण करीत असताना मागून आलेल्या एका कारमधून एक हात उंचावला. गडकरींचे लक्ष त्या कारकडे गेले. नजरानजर झाली. स्मित केले. तुझ्यामुळे जिंकलो..मनातल्या मनात तो मूक संवाद.. डोळ्यातून व्यक्त होत होता. त्यांचा विजयी जल्लोष पाहत त्या भारावून गेल्या होत्या. गर्दीमुळे जीप समोर निघाली, कार जागेवरच थांबली. त्यामध्ये होत्या गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी.