शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
7
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
8
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
10
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
11
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
12
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
13
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
14
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
15
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
16
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
17
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
18
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
19
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
20
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात नोटाचा अधिक वापर

By admin | Updated: May 20, 2014 00:59 IST

१६ व्या लोकसभा निवडणुकांमध्ये गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात तब्बल २४ हजार ८८८ मतदारांनी नोटाचा वापर केला आहे.

 गडचिरोली : १६ व्या लोकसभा निवडणुकांमध्ये गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात तब्बल २४ हजार ८८८ मतदारांनी नोटाचा वापर केला आहे. राज्यात नोटाचा सर्वाधिक वापर गडचिरोली जिल्ह्यात झाला असा सूर उमटला आहे. मात्र जिल्ह्यात आदिवासीबहुल भागांमध्ये मतदारांच्या अज्ञानामुळे हा प्रकार घडला, असे मत विविध राजकीय पक्षाचे लोक व्यक्त करीत आहेत. या निवडणुकीत प्रथमच निवडणूक आयोगाकडून नोटाचा वापर करण्याची संधी देण्यात आली होती. गडचिरोली-चिमूर या मतदार संघात २४ हजार ४८८ मतदारांनी नोटाचा वापर केला. यामध्ये आमगाव विधानसभा क्षेत्रात ३,०९६, आरमोरीमध्ये ४,३०७, गडचिरोलीमध्ये ४,५२०, अहेरीमध्ये ७,५४४, ब्रम्हपूरीमध्ये २,५६१, चिमूरमध्ये २,४५१ मतदारांनी नकाराधिकाराचा वापर केला आहे. तर ९ मतदारांनी पोस्टल मतदानाच्या माध्यमातून नोटा मतदानाचा हक्क बजावला आहे. सर्वाधिक नकाराधिकार मताचा वापर अहेरी विधानसभा क्षेत्रात झाल्याचे दिसून येत आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रात अहेरी, भामरागड, सिरोंचा, एटापल्ली, मुलचेरा हे तालुके येतात. या तालुक्यांमध्ये दुर्गम व अतिदुर्गम अनेक तालुके आहेत. या भागात मतदार ईव्हीएम मशीनवर पहिल्या किंवा शेवटच्या क्रमांकाच्या बटनांचा अधिक वापर करतात, असे निवडणुकांमध्ये अनेकदा घडलेले आहे. गडचिरोली चिमूर क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर यंदा भाजप उमेदवाराचे नाव तर शेवटच्या क्रमांकावर नोटाचे बटन होते. ग्रामीण भागातील नागरिकांनी शेवटच्या बटनवर हे मतदान केले. त्यांना नोटा काय आहे याची जाणीवही नव्हती, असे राजकीय पक्षांच्या जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे अहेरी या एकाच विधानसभा क्षेत्रात ७ हजारावर अधिक मतदारांनी नोटाचा वापर केला. हे दिसून येते. इतर शहरी भागातील विधानसभा क्षेत्रात मात्र नोटाचे मतदान राज्याच्या इतर भागासारखेच झालेले आहेत. तसेही गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदार संघात विविध सामाजिक संघटनांनी नोटा मतदानाच्या अधिकाराबाबत जनजागृती मोहीम राबविली होती. (जिल्हा प्रतिनिधी)