अतिक्रमण नागपुरात मावेना, पण कारवाई फक्त सीताबर्डीत का ? प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित

By शुभांगी काळमेघ | Updated: September 29, 2025 20:10 IST2025-09-29T20:07:39+5:302025-09-29T20:10:35+5:30

Nagpur : सीताबर्डीपासून केवळ १०० मीटर अंतरावर, झान्शी राणी चौकजवळ हिंदी मोर भवन बाहेर फेरीवाल्यांचा तंबूत पसारा आहे, ज्यामुळे फूटपाथ पूर्ण त्यांच्या ताब्यात गेला ज्यामुळे वाहन चालकांना गाडी चालवण्यास त्रास होतो.

Full of Encroachment in Nagpur, but why action is taken only in Sitabardi? Question mark on the work of the administration | अतिक्रमण नागपुरात मावेना, पण कारवाई फक्त सीताबर्डीत का ? प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित

Full of Encroachment in Nagpur, but why action is taken only in Sitabardi? Question mark on the work of the administration

नागपूर : महानगरपालिका आणि शहरातील ट्रॅफिक पोलिस यांच्याकडून सीताबर्डी येथील फेरीवाल्यांवर कठोर कारवाई केली जात आहे, पण शहरातील इतर भागांतील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. मुख्य रस्ते, फूटपाथ आणि व्यस्त चौकांमध्ये फेरीवाल्यांचा पसारा इतका वाढला आहे की नागरिकांना पायदळ चालण्यासाठी जागाच उरत नाही. 

तेच सीताबर्डीपासून केवळ १०० मीटर अंतरावर, झान्शी राणी चौकजवळ हिंदी मोर भवन बाहेर फेरीवाल्यांचा तंबूत पसारा आहे, ज्यामुळे फूटपाथ पूर्ण त्यांच्या ताब्यात गेला ज्यामुळे वाहन चालकांना गाडी चालवण्यास त्रास होतो. तसेच शहरातील VNIT च्या आजूबाजूला, इंदोरा चौकमध्ये आणि गांधीनगर, इतवारी भागात देखील फेरीवाले रस्त्यांवर, फूटपाथवर पसारा केलेले आढळतात. 

वाहतूक करणाऱ्यांना आणि पायदळ प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. काही वेळा ५०० मीटर अंतर पार करण्यासाठी २० मिनिटे किंवा त्याहून अधिक वेळ लागतो, विशेषतः गर्दीच्या काळात. 

का फक्त सिटाबल्दीला कारवाई?

नगर आयुक्त अभिजीत चौधरी आणि पोलीस आयुक्त रविंदर सिंगल यांनी सीताबर्डी मुख्य रस्ता स्वच्छ ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. सीताबर्डी येथे सकाळी ९:३० ते रात्री उशिरापर्यंत फेरीवाल्यांना गर्दी न करण्याचे आदेश आहेत. परंतु, इतर भागांमध्ये सुनियोजित कारवाई होते आहे असे दिसत नाही. 

नागरिकांचा त्रास आणि मागणी

वाहनचालकांच्या म्हणण्यानुसार नागपूर फक्त सीताबर्डी नाही. जर नगर निगम आणि पोलिस नगरपालिका सगळ्याच भागात अतिक्रमणाविरोधी कारवाई केली नाही, तर वाहतूक कोलमडेल, पादचारी सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होईल. अतिक्रमण शहरभर आहे, पण ते दुर्लक्षित ठेवले जात आहे. 
 

Web Title : नागपुर अतिक्रमण: सिताबर्डी ही क्यों? प्रशासन की चयनात्मक कार्रवाई पर सवाल।

Web Summary : नागपुर के नागरिकों ने सवाल उठाया कि सिताबर्डी में ही अतिक्रमण विरोधी अभियान क्यों चलाए जा रहे हैं, जबकि अन्य क्षेत्रों में अतिक्रमण को अनदेखा किया जा रहा है, जिससे पैदल चलने वालों और यातायात को परेशानी हो रही है। चयनात्मक कार्रवाई चिंता पैदा करती है।

Web Title : Nagpur Encroachments: Why only Sitabardi? Administration questioned on selective action.

Web Summary : Nagpur citizens question why Sitabardi faces strict anti-encroachment drives while other areas with rampant encroachments are ignored, causing pedestrian and traffic woes. Selective action raises concerns.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.