शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
'२५ हजार दिल्याशिवाय पेन्शन नाही!' रेल्वेच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं
5
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
6
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
7
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
8
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
9
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
10
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
11
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
12
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
13
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
14
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

फार्महाउसवर मैत्रिणीचा वाढदिवस, मित्रांसोबत स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा होता बेत; उडी घेताच त्याला मृत्यूने गाठले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 18:37 IST

Nagpur : पाण्यात उतरताच त्याला जोरात विजेचा धक्का लागला व तो बेशुद्ध झाला. त्यामुळे त्याला तातडीने डॉक्टरकडे नेण्यात आले. तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

लोकमत न्यूज नेटवर्ककन्हान : स्विमिंग पूलमधील पाण्यात उतरताच तरुणाला जोरात विजेचा धक्का लागला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गाडेघाट -जुनी कामठी रोडवरील राज फार्म हाऊसच्या आवारात रविवारी (दि.१२) मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. त्या पाण्यात वीजप्रवाह कसा प्रवाहित झाला, हे मात्र स्पष्ट झाले नाही.

मयूर सुधाकर मांडवगडे (वय ३३, रा. रुक्मिणी नगर, हुडकेश्वर रोड, नागपूर) असे मृताचे नाव आहे. मयूर व त्याचा मित्र शुभम सुरेंद्र राघौरे (३०, रा. विनायक नगर, हुडकेश्वर रोड, नागपूर) हे दोघे त्यांच्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नागपूरहून कन्हान परिसरातील राज फार्म हाऊस येथे आले होते. या फार्म हाऊसच्या आवारात स्विमिंग पूल असल्याने, तसेच त्यात पाणी भरून असल्याने मयूर पोहण्यासाठी पाण्यात उतरला.

पाण्यात उतरताच त्याला जोरात विजेचा धक्का लागला व तो बेशुद्ध झाला. त्यामुळे त्याला तातडीने डॉक्टरकडे नेण्यात आले. तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. माहिती मिळताच ठाणेदार वैजयंती मांडवधरे व पोलिस उपनिरीक्षक एकनाथ राठोड यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पाहणी व पंचनामा केला. शिवाय, मयूरचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. पाण्यात वीजप्रवाह प्रवाहित झाला कसा, याचा शोध घेऊन दोषींवर कारवाई करणे गरजेचे आहे. याप्रकरणी कन्हान पोलिसांनी शुभम राघौरे याच्या तक्रारीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Birthday Pool Tragedy: Electric Shock Kills Man at Farmhouse Party

Web Summary : A man died from an electric shock while swimming at a farmhouse birthday party near Kanhan. Mayur Mandavgade, 33, was electrocuted upon entering the pool. Police are investigating the source of the electricity and have registered a case of accidental death.
टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू