शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

फ्रान्सच्या चमूचे मिशन मेट्रो रेल्वे

By admin | Updated: March 25, 2015 02:18 IST

नागपुरातील वाहतुकीला पर्याय ठरणाऱ्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाला फ्रान्स सरकारच्या कंपनी फ्रेंच डेव्हलपमेंट एजन्सीची (एएफडी) कर्ज देण्याची तयारी आहे.

नागपूर : नागपुरातील वाहतुकीला पर्याय ठरणाऱ्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाला फ्रान्स सरकारच्या कंपनी फ्रेंच डेव्हलपमेंट एजन्सीची (एएफडी) कर्ज देण्याची तयारी आहे. कर्ज देण्यापूर्वी प्रत्येक पैलूचा बारकाईने अभ्यास करण्यासाठी फ्रान्सची तीन सदस्यीय चमू गुरुवार, २६ मार्चला तीन दिवसीय दौऱ्यावर नागपुरात येत आहे. ही चमू प्रस्तावित रेल्वे लाईनची पाहणी, स्थानिक प्रशासनाशी चर्चा, याशिवाय मेट्रो रेल्वेशी जुळलेल्या प्रत्येक भागधारकांशीही चर्चा करणार आहे. तसेच मिहान, शहर बसस्टॉप, मेट्रो रेल्वेचे प्रस्तावित कॅरिडार आदींचीही पाहणी करणार आहे. मेट्रो रेल्वेपर्यंत पोहोचण्यासाठी वाहतुकीच्या अन्य साधनांचीही माहिती ही चमू घेणार आहे. फ्रान्सची चमू बंगळुरूमार्गे नागपुरात येणार असल्याची माहिती फ्रान्सच्या कंपनीने नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडला (एनएमआरसी) दिली आहे. मेट्रो रेल्वेशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, नोव्हेंबर २००४ मध्ये आर्थिक प्रकरणांशी जुळलेल्या विभागाने (डीईए) फ्रान्सच्या सरकारी कंपनीच्या माध्यमातून नागपूर मेट्रो रेल्वेशी कर्ज देण्यासाठी संपर्क केला होता. एएफडीने २०० दशलक्ष युरो अर्थात १५०० कोटी रुपये कर्ज देण्यास मंजुरी दिली आहे. त्यानंतरही हा दौरा महत्त्वपूर्ण समजला जात आहे. अधिकृत दौऱ्यानंतर कर्ज देण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. दिल्ली येथे १३ मार्च रोजी झालेल्या कंपनीच्या पहिल्या संचालकांच्या बैठकीत फ्रान्सच्या चमूसंदर्भात विशेष योजना तयार केली होती. २६ मार्चला ही चमू मनपा आणि झोपडपट्टी पुनर्वसन विभागाची भेट घेणार आहे. २७ मार्चला नागपूर सुधार प्रन्यास आणि नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आणि २८ मार्चला मिहानचा दौरा करणार आहे. आॅटोरिक्षा असोसिएशन आणि अन्य व्यावसायिक संघटनांच्या नेत्यांसोबत ही चमू चर्चा करणार आहे. (प्रतिनिधी)