शहरं
Join us  
Trending Stories
1
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
2
CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट
3
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
4
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
5
Latest Marathi News LIVE Updates: "धारावीकरांना हुसकावून लावण्यासाठी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त...", काँग्रेस खासदारांचा गंभीर आरोप
6
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
7
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
8
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
9
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
10
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
11
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
12
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
13
Vastu Shastra: घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग एकदा भिंतीवरची चित्र बदलून पाहाच!
14
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
15
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
16
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
17
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
18
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
20
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
Daily Top 2Weekly Top 5

त्या आदिवासी विद्यार्थ्यांना बसचा मोफत पास

By admin | Updated: December 14, 2015 03:15 IST

आदिवासी विकास विभागाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही,

नागपूर : आदिवासी विकास विभागाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही, त्यांना राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचा मोफत पास देण्यात येईल, असे आश्वासन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी विधानसभेत दिले. विधानसभा सदस्य वैभव पिचड यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आदिवासी विकास मंत्री सावरा म्हणाले, आदिवासी विकास विभागाच्या वतीने कार्यरत शासकीय आदिवासी वसतिगृहात सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात एकूण ५५,९९८ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहांमध्ये प्रवेश मिळालेला नाही, त्या विद्यार्थ्यांना एस.टी. बसचा पास देण्याचा शासनाचा सकारात्मक विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना चांगले दिवस यावेत म्हणून विविध उपाययोजना राज्यातील शेती व शेतकरी यांना चांगले दिवस यावेत यासाठी शासनाने विविध निर्णय घेतले असून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. या उपाययोजनांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही कृषी, मदत व पुनर्वसन कार्य मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य वीरेंद्र जगताप, अमिन पटेल, असलम शेख, अब्दुल सत्तार, अमित झनक यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खडसे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मनातील नैराश्य दूर करून त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी समित्या नेमल्या आहेत. याखेरीज शासनाने जलयुक्त शिवार, शेततळी, युरिया खताच्या किमती वाढू न देता मर्यादित ठेवणे, १४ जिल्ह्यांतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बी.टी. कापूस बियाण्यांच्या दरात पिशवीमागे १०० रुपये व प्रति किलोमागे २५० रुपये कमी करणे, एक लाख हेक्टर क्षेत्रावर १०० टक्के अनुदानाने फळ झाड लागवड, दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची फी माफी, दोन लाख रुपयांचे संरक्षण देणारा अपघात विमा, शेती कर्जाचे पुनर्गठन, व्याज माफी, सघन सिंचन, ५० टक्के अनुदानावर दुभत्या जनावरांचे वाटप, शेततळी इत्यादी अनेक उपायायेजना केल्या आहेत. या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या निश्चितपणे कमी होतील, असा विश्वास कृषिमंत्री खडसे यांनी यावेळी व्यक्त केला. (प्रतिनिधी)