शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाचे आमिष दाखवून फसवणूक

By admin | Updated: March 4, 2016 02:49 IST

शासकीय योजनेनुसार झटपट कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून शेकडो गोरगरीब महिलांची फसवणूक केल्याची घटना उजेडात आली आहे.

फसगत झालेल्यात गोरगरीब महिला : आरोपी पसारनागपूर : शासकीय योजनेनुसार झटपट कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून शेकडो गोरगरीब महिलांची फसवणूक केल्याची घटना उजेडात आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.आरोपी संजय सदाशिव सरदार, त्याची पत्नी (रा. एनआयटी क्वॉर्टर नारी रोड) आणि कृष्णा संतोष बघेले (वय ३६, रा. राजीवनगर) यांनी गेल्या वर्षी बचतगट तसेच महिलांना खादी ग्रामोद्योगांतर्गत १० लाखांचे कर्ज मिळवून देण्याची बतावणी केली होती. कर्णोपकर्णी माहिती मिळाल्यामुळे रमा दिलीप ससाने (वय ४०, रा. साईनगर, हिंगणा रोड) आणिं अन्य १०० पेक्षा जास्त महिलांनी त्यांच्याशी संपर्क साधला.कर्ज अन् अनुदानही आरोपींनी भोळ्याभाबड्या महिलांवर प्रभाव टाकण्यासाठी चांगले कार्यालयही थाटले होते. त्यांनी संपर्क साधला त्या प्रत्येकीला ते कर्जाचे आमिष दाखवायचे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, अशी बतावणी करून आरोपी संपर्क साधणाऱ्या प्रत्येकाला आणखी महिलांना घेऊन यायला सांगत होते. अशा प्रकारे एकीने दुसरीला आणि दुसरीने तिसरीला आरोपींच्या कार्यालयात नेले. १० लाखांचे कर्ज अत्यंत कमी व्याजदरात उपलब्ध करून देण्यासोबतच २० ते ३५ टक्केपर्यंत कर्जाच्या रकमेतून शासन अनुदानही देणार असल्याची बतावणी आरोपींनी केली. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून कर्ज मिळवण्यासाठी प्रत्येकीने आरोपींकडे वेगवेगळी रक्कम जमा केली. जून ते नोव्हेंबर २०१५ पर्यंत लाखोंची रक्कम गोळा केल्यानंतर आरोपी पसार झाले. चार महिन्यांपासून ते संपर्कात नसल्यामुळे हवालदिल महिलांनी बुधवारी एमआयडीसी ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाणेदार विष्णूकांत भोये यांनी लगेच त्याची दखल घेत आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. दरम्यान, बुधवारी पोलिसांकडे चाळीसएक महिला आल्या. आता हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)जनधन योजनाअशाच प्रकारे जनधन योजनेनुसार आपल्या कंपनीकडून अल्प व्याजदरात आणि अल्पावधीत कर्ज मिळवून दिले जात असल्याची जाहिरात मॅट लाईन्स फायनान्स को आॅपरेटिव्ह लि. कंपनीने वर्तमानपत्रात दिली होती. ती वाचून ते २० आॅक्टोबर २०१५ या कालावधीत एमआयडीसीतील शिवविहार कॉलनीत राहणारे मिलिंद सेवकराम विजेवार (वय ३०) यांनी कंपनीत संपर्क केला. आयशा मेहरा, मिस वंदना मेहरा, मिस निरू आणि कंपनीच्या इतरांनी त्यांना १० लाख रुपयांचे कर्ज मिळवून देतो, अशी बतावणी केली. त्याबदल्यात वेगवेगळी कारणं सांगून ११,२५० रुपये उकळले. आता चार महिने झाले तरी कर्जाची रक्कम उपलब्ध करून दिली नाही. उपरोक्त कंपनीच्या संचालकांनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे विजेवार यांनी एमआयडीसी ठाण्यात तक्रार नोंदवली.