ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनच्या व्यवहारात फसवणूक : पावणेसहा लाख हडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 23:30 IST2021-05-13T23:27:51+5:302021-05-13T23:30:17+5:30
Fraud in Oxygen Concentrator Machine ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात दिल्लीतील आरोपीने गोंदियातील तरुणाचे पावणेसहा लाख रुपये हडपले.

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनच्या व्यवहारात फसवणूक : पावणेसहा लाख हडपले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात दिल्लीतील आरोपीने गोंदियातील तरुणाचे पावणेसहा लाख रुपये हडपले.
स्वप्निल नारायण जमाईवार (३२) हे रामनगर गोंदिया येथील निवासी आहेत. ते गेल्या काही दिवसांपासून नंदनवनमधील व्यंकटेश नगरात राहतात. त्यांनी श्यामनगर पश्चिम दिल्ली येथील रहिवासी आरोपी राहुल बुद्धीराजा याच्यासोबत १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन विकत घेण्याचा सौदा केला होता. त्यासाठी १८ ते २० एप्रिलदरम्यान आरोपी राहुलच्या खात्यात स्वप्निल यांनी पाच लाख, ७५ हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. रक्कम काढून घेतल्यानंतर आरोपींनी मशीन पाठविल्या नाहीत. प्रत्येक वेळेस वेगवेगळे कारण सांगून त्याने स्वप्निल यांना टाळले. त्याने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर स्वप्निल यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.