शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
5
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
6
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
7
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
8
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
9
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
10
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
11
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
12
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
13
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
14
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
15
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
16
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
17
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
18
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
19
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
20
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
Daily Top 2Weekly Top 5

मोहब्बतसिंग तुलीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मध्य भारतातील मोठे हॉटेल व्यावसायिक मोहब्बतसिंग तुली यांच्याविरुद्ध तहसील पोलिसांनी सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मध्य भारतातील मोठे हॉटेल व्यावसायिक मोहब्बतसिंग तुली यांच्याविरुद्ध तहसील पोलिसांनी सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. भाऊ आणि पुतण्याचे कोट्यवधींचे शेअर्स स्वत:च्या नावाने करून घेत मोहब्बतसिंग यांनी आपली फसवणूक केल्याची तक्रार त्यांच्या पुतण्याने पोलिसांत नोंदविली, त्यावरून हा गुन्हा दाखल झाला आहे.

अजिंदरसिंग गुरुलालसिंग तुली (वय ६०, रा. क्लॉर्क टाऊन) असे तक्रारकर्त्यांचे नाव असून, ते मोहब्बतसिंग यांचे पुतणे आहेत. त्यांनी मोहब्बतसिंग कपूरसिंग तुली यांच्यासोबत २ जुलै २०११ ला गांधीबाग ईतवारीत बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट गॅरेज कंपनी सुरू केली होती. भारत सरकार मंत्रालय कंपनी रजिस्ट्रर मुंबई येथील कार्यालयात ग्रेट रोडवेज प्रा. लि. कंपनीच्या नावाने नोंदणी करण्यात आली. या कंपनीत फिर्यादी अजिंदरसिंग १९९४ पासूनच कार्यरत होते. कंपनीच्या स्थापनेनंतर अजिंदरसिंग यांनी कंपनीच्या नावे ७५ टक्के शेअर्स खरेदी केले होते. कंपनीत अजिंदरसिंग यांचे वडील गुरुलालसिंग कपूरसिंग तुली (मोहब्बतसिंग यांचे बंधू ) हेसुद्धा संचालक होते. त्यांनी ग्रेट रोडवेज कंपनीच्या नावाने १७,५०० शेअर्स खरेदी केले होते. अशाप्रकारे अजिंदरसिंग आणि त्यांच्या वडिलांच्या नावे एकूण २२, ५०० शेअर्स होते. अजिंदरसिंग यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर अजिंदरसिंग यांनी घरातील कागदपत्रांची पडताळणी केली तेव्हा त्यांना स्वताच्या आणि वडिलांच्या नावे असलेल्या २२,५०० शेअर्सबाबत संशय आला. त्यामुळे त्यांनी कंपनीत विचारपूस केली असता ते शेअर्स मोहब्बतसिंग तुली यांनी आपल्या नावे करून घेतल्याचे त्यांना कळले. याबाबत अजिंदरसिंग यांनी मोहब्बतसिंग यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी दाद दिली नसल्याचे समजते. कोणताही करार किंवा निर्णय झाला नसताना मोहब्बतसिंग यांनी अजिंदरसिंग यांचे शेअर्स आपल्या नावाने करून आपला विश्वासघात केल्याची भावना झाल्यामुळे अजिंदरसिंग यांनी पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांच्याकडे तक्रार नोंदवली. उपलब्ध कागदपत्रे तपासल्यानंतर सोमवारी तहसील पोलिसांना या प्रकरणात मोहब्बतसिंग तुली यांच्याविरुद्ध विश्वासघात करून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्याचे आदेश मिळाले. त्यावरून पोलिसांनी भादंविच्या कलम

४०६, ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. मंगळवारी रात्रीपर्यंत या प्रकरणात तुली यांना अटक झालेली नव्हती.

----

साथीदारांचाही फसवणुकीत सहभाग

मोहब्बतसिंग यांच्या कंपनीचे ट्रान्सपोर्टचे काम श्रीलंकेतही असून, तेथे सुमारे १०० वॉल्वो ट्रेलर लाखोंचा व्यवसाय करीत असल्याचे समजते. या माहितीबद्दल मात्र अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

दरम्यान, फसवणुकीच्या या प्रकरणात पोलिसांनी प्रेसनोटमध्ये म्हणून मोहब्बतसिंग यांचेच नाव दिले आहे. मात्र, कलम ३४ ही लावले आहे. त्यामुळे या फसवणुकीत मोहब्बतसिंग यांच्यासोबत आणखी आरोपी असल्याचे स्पष्ट होते. ते दुसरे आरोपी किती आणि कोण? ते मात्र पोलिसांकडून स्पष्ट झाले नाही.

----