शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

बारावी पेपरफूट प्रकरणात आणखी चार आरोपी अटकेत, मुख्याध्यापक-कॉलेज संचालकाचादेखील समावेश

By योगेश पांडे | Updated: February 27, 2026 20:25 IST

पेपरफूटीची पाळेमुळे खोलवर रुतलेली : अनेक कोचिंग क्लासेसमध्ये फॉरवर्ड झाली होती प्रश्नपत्रिका

योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बारावीच्या पेपरफूट प्रकरणात आणखी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात अटकेतील एकूण आरोपींची संख्या आठ इतकी झाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे केवळ कोचिंग क्लास संचालकच नव्हे तर आता कनिष्ठ महाविद्यालयाचा मुख्याध्यापक व महाविद्यालय संचालकदेखील पोलिसांच्या हाती लागले आहेत. सद्यस्थितीतील चौकशीच्या स्थितीनुसार जयताळा येथील कनिष्ठ महाविद्यालयातील संचालकाने पेपर फॉरवर्ड केल्याची बाब समोर आली आहे. या एकूण प्रकरणाची पाळेमुळे खोलवर रुतलेली असून अनेक कोचिंग क्लासेस व विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका उत्तरांसह फॉरवर्ड झाली होती.

जयताळा येथील विद्यासाधना शाळेचा संचालक संदीप बाबूराव सरटकर (४६, जयताळा), विशाखा कनिष्ठ महाविद्यालयाचा मुख्याध्यापक प्रदीप भैय्यालाल जांगडे (४३, आराधना कॉलनी, नारा मार्ग), एज्युकेशन ॲकेडमी या कोचिंग क्लासचा संचालक मनिष शंभरकर (४६, गोदाम ले आऊट, त्रिमूर्तीनगर) व दिनेश कोटांगळे (३७, कबीरनगर, नारी मार्ग) अशी अटकेतील आणखी आरोपींची नावे आहे.

सिव्हिल लाइन्स परिसरातील सेंट उर्सुला हायस्कूलमधील परीक्षा केंद्रावर १८ फेब्रुवारी रोजी एका विद्यार्थिनीच्या मोबाइलमधील व्हाॅट्सॲप ग्रुपवर परीक्षा सुरू हाेण्यापूर्वीच रसायनशास्त्राचा पेपर आलेला हाेता, तसेच त्याच ग्रुपवर प्रश्नांची उत्तरेसुद्धा आलेली हाेती. विद्यार्थिनींच्या मोबाइलमध्ये १६ फेब्रुवारी रोजी झालेला भौतिकशास्त्राचाही पेपर सापडला. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अनिल दहीफळे यांच्या तक्रारीवरून पाेलिसांनी पेपर फोडणाऱ्यावर गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी निशिकांत मूल (४५, मानकापूर) व फरहान अख्तर (१९, कामगारनगर), एक्सेलेन्ट अकॅडमीचा संचालक मुस्तफा खान मुनीर खान (४२, भानखेडा) व जुनेद मोहम्मद अब्दुल जावेद (२४, हसनबाग) यांना अटक केली होती. मुस्तफा व जुनेद यांना दिनेश कोटांगळे (३७, कबीरनगर, नारी मार्ग) याने व्हॉट्सअपद्वारे रसायनशास्त्र व गणिताचा पेपर फॉरवर्ड केल्याचे तांत्रिक चौकशीतून समोर आले. सर्व आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुख्याध्यापकाने दिली रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका

कोटांगळेला अटक करून त्याची चौकशी करण्यात आली. कोटांगळेला त्याचा परिचयाचा आरोपी अल्ताफ गोडिल याने बारावीचा पेपर परीक्षेअगोदर मिळू शकतो का अशी विचारणा केली होती. दिनेशने सूरज सहारे नावाच्या व्यक्तीला फोन केला असता त्याने मनीष शंभरकर याच्या मार्फत प्रदीप जांगडेला भेटायला सांगितले. दिनेश व अल्ताफ हे प्रदीप जांगडेला भेटले. प्रदीपने दिनेशला रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका व उत्तरे दिली. दिनेशने ते अल्ताफला व्हॉट्सअपवर फॉरवर्ड केले. २१ फेब्रुवारी रोजी गणिताचा पेपर होता. तोदेखील जांगडे व दिनेशने अल्ताफ व मुस्तफा मुनीर यांच्या मोबाईलवर पाठविला होता.

महाविद्यालय संचालकाची ‘लिंक’ महत्त्वाची 

पोलिसांनी मुख्याध्यापक प्रदीप जांगडे याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता पेपर संदीप सरटकरने पाठविल्याचे सांगितले. संदीप सरटकर हा विद्यासाधना शाळा चालवितो. त्याच्याकडे या प्रश्नपत्रिका नेमक्या कुठून आल्या. त्याने केंद्रावरून अगोदरच प्रश्नपत्रिका काढली व बोर्डातून प्रश्नपत्रिका मिळाली याची पोलीस चौकशी करत आहे. सरटकर या संपूर्ण साखळीतील महत्त्वाचा दुवा असून त्याच्या माध्यमातून आणखी महत्त्वाची माहिती भेटू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Four more arrested in 12th grade paper leak case.

Web Summary : Four more individuals, including a principal and college director, have been arrested in connection with the 12th-grade paper leak case. Investigations reveal a widespread network involving coaching classes and students receiving leaked question papers with answers before exams.
टॅग्स :nagpurनागपूरexamपरीक्षाEducationशिक्षणHSC / 12th Exam12वी परीक्षा