शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
4
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
5
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
6
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
7
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
8
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
9
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
10
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
11
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
12
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
13
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
14
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
15
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
16
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
17
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
18
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
19
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
20
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून

महाजेनकोची सात पैकी चार विद्युत केंद्रे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 9:16 PM

कोरोना विषाणूच्या संक्रमणाला रोखण्यासाठी करण्यता आलेल्या लॉकडाऊनचा कहर विज उत्पादन क्षेत्रावर पडलेला दिसून येतो. उद्योग आणि व्यावसायिक प्रतिष्ठो बंद असल्याच्या कारणाने विजेची मागणी घसरत १५ हजार मेगाव्हॅटपर्यंत उतरली आहे. त्यामुळे महाजेनकोचे सातपैकी चार विद्युत केंद्रे बंद पडलेली आहेत.

ठळक मुद्देउद्योगक्षेत्रे बंद असल्याचा परिणामगरज १५ हजार मेगाव्हॅटची

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूच्या संक्रमणाला रोखण्यासाठी करण्यता आलेल्या लॉकडाऊनचा कहर विज उत्पादन क्षेत्रावर पडलेला दिसून येतो. उद्योग आणि व्यावसायिक प्रतिष्ठो बंद असल्याच्या कारणाने विजेची मागणी घसरत १५ हजार मेगाव्हॅटपर्यंत उतरली आहे. त्यामुळे महाजेनकोचे सातपैकी चार विद्युत केंद्रे बंद पडलेली आहेत.जिल्ह्यातील खापरखेडा वीज केंद्रासह नाशिक, परळी व भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील वीज उत्पादन थांबवण्यात आले आहे. कोरोडी औष्णिक विद्युत केंद्र सर्वाधिक ११७४ मेगाव्हॅटचे उत्पादन करत आहे तर पारस ४३५ मेगाव्हॅट आणि चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र विजेचे उत्पदन करत आहे. कोयना सह हायड्रो प्रोजेक्ट ६७४ आणि गॅस आधारित उरण प्रकल्पातून २७४ मेगाव्हॅट विजेचे उत्पादन होत आहे. अशा स्थितीत महाजेनकोचे एकूण उत्पादन ३७१९ मेगाव्हॅटपर्यंत घसरले आहे. जेव्हाकी या केंद्रांची उत्पादन क्षमता १३,६०२ मेगाव्हॅट इतकी आहे. मुंबईसह इतर प्रदेशातील विजेची एकूण मागणी १५ हजार मेगाव्हॅटच्या जवळपास आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजता विजेची एकूण मागणी १४,८१३ मेगाव्हॅट इतकी होती. अशा स्थितीत महावितरणने खाजगी क्षेत्राकडून ४४७९ व सेंट्रल एक्सचेंजकडून मिळालेल्या ५२१३ मेगाव्हॅटच्या आधारावर विजेची मागणी पूर्ण केली. विशेष म्हणजे मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासून राज्यात विजेच्या मागणीचे सत्र वाढत असते आणि एप्रिलच्या मध्यापर्यंत ही मागणी २३ हजार मेगाव्हॅटपर्यंत पोहोचत असते. परंतु, लॉकडाऊनमुळे केवळ घरेलू आणि कृषी क्षेत्रातूनच विजेची मागणी वाढल्याने राज्यात विज अनुकुलता पुरेसी म्हटली जात आहे. अशा स्थितीत महाग उत्पादन लागत असलेले विद्युत युनिट बंद करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार रविवारी लाईट्स बंद करून नागरिकांनी दिवे लावले होते. त्याही दिवशी हीच चार केंद्रे सुरू होती. तेव्हापासून आधीच बंद करण्यात आलेली केंद्र आताही बंद ठेवण्यात आली आहेत. 

टॅग्स :electricityवीज