शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
4
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
5
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
6
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
7
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
8
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
9
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
10
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
11
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
12
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
13
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
14
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
15
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
16
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
17
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
18
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
19
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
20
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन

लुटमारीच्या तयारीतील चार गुंड जेरबंद

By admin | Published: June 26, 2017 2:00 AM

लुटमार करण्याच्या तयारीतील चार आरोपींना यशोधरानगर पोलिसांनी जेरबंद केले.

शस्त्र जप्त, एक फरार : यशोधरानगर पोलिसांची कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लुटमार करण्याच्या तयारीतील चार आरोपींना यशोधरानगर पोलिसांनी जेरबंद केले. शेख सलीम शेख शब्बीर (२९, रा. मच्छीपूल, जुनी कामठी), आफीक हुसेन ख्वाजा गुलाम अब्बास हुसेन (२८, रा. हमीदनगर), मोहम्मद रसूल मोहम्मद रमजान अन्सारी (४०, रा. हमीदनगर) आणि मनोज मधुकर भैसारे (२७, रा. जुनी कामठी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांचा पाचवा साथीदार रशीद शहा खान (३०, रा. अकोला ) अंधाराचा फायदा घेत मोटारसायकलने घटनास्थळाहून फरार झाला. बीट मार्शल सुरेश बेले व शरद मुंडे शुक्रवारी रात्री गस्त करीत असताना त्यांना काही इसम कामठी रोडवर भिलगाव परिसरातील गंगवाणी कॉम्प्लेक्सच्या मागे संशयास्पदरीत्या लपून बसले आहेत,अशी माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी यशोधरानगर पोलिसांची मदत मागितली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी. वाय. मेश्राम, सहायक निरीक्षक डी. आर. बावणकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह लगेच धाव घेत बेले आणि मुंडेच्या मदतीने सशस्त्र आरोपींना घेराव घातला. त्यात चार उपरोक्त आरोपी सापडले. मात्र, रशीद खान हा मोटारसायकलने पळून जाण्यात यशस्वी झाला. पकडलेल्या आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याजवळ फणस कापण्याचे लोखंडी पाते, लोखंडी रॉड, दोन लोखंडी कटोनी, दोन लोखंडी टायर खोलण्याचे रॉड, १ टॉर्च, मिरची पावडर आणि एक मोटरसायकल असा एकूण ८६ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी. वाय. मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक डी. आर. बावणकर, पोलीस उपनिरीक्षक राठोड, बीट मार्शल सुरेश बेले, शरद मुंडे, हवालदार प्रकाश काळे, दीपक धानोरकर, नायक पोलीस शिपाई संतोष यादव, गजानन गोसावी, शिपाई चेतन जाधव यांनी ही कामगिरी बजावली. आरोपींकडून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस वर्तवित आहेत.