शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

एमटीडीसीला ‘मारबत महोत्सव’चा विसर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 11:08 AM

नागपुरात मारबत महोत्सवाकडे महाराष्ट्र पर्यटन विभागाने (एमटीडीसी) कायम दुर्लक्ष केले आहे.

ठळक मुद्देपाच वर्षांपासून दुर्लक्षचविभागीय व मुख्य कार्यालयाचा ‘पहले आप’चा तिढा

प्रवीण खापरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी नागपुरात मारबत महोत्सव साजरा होतो. या परंपरेला १३५ हून अधिक वर्षांची परंपरा आहे. याकडे महाराष्ट्र पर्यटन विभागाने (एमटीडीसी) कायम दुर्लक्ष केले आहे. २०१४ मध्ये कसेतरी लगबगीने या महोत्सवात तोंडदिखाऊपणा केला गेला, मात्र त्यानंतर पाच वर्षे लोटली. नागपूर-विदर्भाची विशेष ओळख असलेला मारबत महोत्सव एमटीडीसीच्या यादीतून गहाळ झाल्याचे दिसून येतो. गेल्या पाच वर्षांपासून एमटीडीसीचे नागपूर विभागीय कार्यालय आणि मुंबई येथे असणारे मुख्य कार्यालय यांच्यात मारबत महोत्सवासंदर्भात समन्वय झालेच नसल्याचे स्पष्ट होते.दोन्ही कार्यालयांमध्ये विचारणा केली असता, दोन्ही कार्यालयांच्या व्यवस्थापकांकडून टोलवाटोलवीची उत्तरे दिली जातात. विभागीय कार्यालयाकडे विचारणा केली असता, मुख्य कार्यालयाकडून महोत्सवाच्या तयारीसंदर्भातील कुठलीही सूचना आली नसल्याचे सांगितले जाते. तर, सूचना का दिली गेली नाही, अशी विचारणा मुख्य कार्यालयाकडे केली असता, जिथे महोत्सव आहे तेथील विभागीय कार्यालयाने प्रस्तावच पाठविला नसल्याने आम्ही कसा काय महोत्सवाबाबतचा निर्णय घेऊ, असे उत्तर दिले जाते. अशा दोन्ही कार्यालयांमध्ये असलेल्या ‘पहले आप’चा तिढा गेल्या पाच वर्षांत सुटलेला नाही. गेल्या वर्षीही अशीच उत्तरे देऊन २०१९ मध्ये महोत्सवात आमचा सहभाग नक्की राहील, अशी बतावणी दोन्ही कार्यालयांकडून करण्यात आली होती, मात्र तशी तयारी अद्याप तरी दिसून येत नाही.

विदर्भातील एकही उपक्रम नियमित नाहीएमटीडीसीतर्फे पर्यटन म्हणा वा महोत्सवाबाबत नियमितता दिसून येत नाही. पर्यटनाच्या बाबतीत सुरू केलेले नागपूर दर्शन आणि खाण पर्यटन केव्हाच थंडबस्त्यात गेले आहे. किमान लोकसहभागातून शतकांपासून सुरू असलेल्या महोत्सवात तरी सातत्याने सहभाग असायला हवा होता. मात्र, उदासीन धोरणामुळे तेथेही एमटीडीसी तुसडे धोरण अमलात आणत असल्याचे दिसून येते.

टॅग्स :cultureसांस्कृतिक