शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
2
Mumbai: अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, डॉक्टरांकडून ५ लाखांत विकण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा दाखल
3
दोन PAN Card ठेवल्यास ₹१०,००० दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा; 'या' सोप्या पद्धतीने सरेंडर करा दुसरे कार्ड!
4
नवी मुंबईत शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला; नुकतेच अमित ठाकरेंनी आंदोलन करत केले होते अनावरण
5
शेअर बाजारातील 'जॅकपॉट' स्टॉक्स : १० महिन्यांत ₹१०००० चे झाले ₹५ लाख; पैशांचा वर्षाव करताहेत ‘हे’ ४ स्टॅाक
6
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
7
Mumbai: मुंबईत कांदा स्वस्त होणार की महागणार? पावसामुळे मोठे नुकसान; उत्पादनाचा अंदाज येईना
8
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
9
Mumbai: शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा, तेलात कापूर पडल्याची माहिती
10
Stock Market: उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स १९५ अंकांनी घसरला; Nifty २६०००० च्या खाली, 'या' स्टॉक्सवर नजर
11
Mumbai: घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू; आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप
12
सुनेसोबत अनैतिक संबंध, मुलाला मार्गातून हटवण्यासाठी बाप झाला हैवान, मग रचलं असं नाटक
13
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
14
दिल्लीतील स्फोटापूर्वी रेकॉर्ड केलेला डॉ. उमरचा व्हिडिओ आला समोर; 'सुसाइड बॉम्बर'चा उल्लेख
15
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
16
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
17
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
18
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
19
Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
20
Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
Daily Top 2Weekly Top 5

दगडफेक प्रकरणात फॉरेन्सिक रिपोर्टने होईल पोलिसांची पोलखोल ! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 19:28 IST

Nagpur : घटनेच्या दुसऱ्याच दिवशी पोलिस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेऊन पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन करून माध्यमांना माहिती दिली. मात्र, त्यांच्या हातात एक्सपर्टचा रिपोर्ट नव्हता देशमुखांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ११ महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या काळात माझ्या गाडीवर झालेल्या दगड हल्ल्याला सुरुवातीपासूनच राजकीय वळण देण्याचा प्रयत्न झाला. हल्ल्यानंतर लगेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'ही सलीम-जावेदची स्टोरी आहे' असे वक्तव्य केले. त्याचबरोबर नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक यांनी चौकशी पूर्ण होण्यापूर्वी आणि फॉरेन्सिक एक्सपर्टचा अहवाल येण्यापूर्वीच ही घटना खोटी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

देशमुख म्हणाले, निवडणुकीच्या काळात माझ्यावर व माझ्या गाडीवर दगडफेक झाली होती. गाडीच्या काचेला दगड लागून ती फुटली आणि माझ्या कपाळावर जखम झाली. फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये स्पष्ट म्हटले आहे की दोन व्यक्तींनी माझ्या गाडीवर दगड मारले. एकाने समोरील काचेला तर दुसऱ्याने मी बसलो होतो त्या मागच्या काचेला दगड मारला, ज्यामुळे काच फुटून माझ्या कपाळाला जखम झाली. 

हा निवडणुकीतील स्टंट : बावनकुळे

माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित घटना ही निवडणुकी दरम्यान सहानुभूती मिळवण्याचा प्रकार होता. हे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. दहा किलोचा दगड खरोखर लागला असता तर वेगळीच परिस्थिती उद्भवली असती. हा प्रकार एक केविलवाणा स्टंट होता. फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर सर्व स्पष्ट होईल, असे मत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

कायदेशीर लढाईची तयारी

आता ११ महिन्यांनी जेव्हा अधिकृत फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आला आहे, त्यामध्ये दोन व्यक्तींनी दगडफेक केल्याचे स्पष्ट नमूद आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षकांनी केलेले विधान राजकीय दबावातून होते हे उघड झाले आहे. याविरोधात कायदेशीर लढा लढणार आहे, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.

पोलिसांवर गंभीर आरोप

घटनेच्या दुसऱ्याच दिवशी पोलिस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेऊन पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन करून माध्यमांना माहिती दिली. मात्र, त्यांच्या हातात एक्सपर्टचा रिपोर्ट नव्हता. दुसऱ्या दिवशी मतदान असल्याने राजकीय दबावाखाली घाईघाईने हा कार्यक्रम घेण्यात आला. यामुळे निवडणुकीच्या निकालावर परिणाम व्हावा, हा प्रयत्न होता, असा आरोप देशमुखांनी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Forensic report exposes police in stone-pelting case: Anil Deshmukh

Web Summary : Anil Deshmukh alleges a political motive behind the stone-pelting incident on his vehicle during elections. He claims the police prematurely declared the incident false, influenced by political pressure. A forensic report now confirms stone-pelting by two individuals, supporting Deshmukh's claim and prompting legal action.
टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेnagpurनागपूर