शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
2
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
3
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
4
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
5
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
6
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
9
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
10
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
11
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
12
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
19
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
20
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जबरानजोतधारकांच्या अडचणी वाढल्या

By admin | Updated: June 16, 2014 01:01 IST

गडचिरोली जिल्ह्यात वैयक्तिक स्वरूपाचे वनपट्टे वाटपाचे काम देशात प्रथम क्रमांकाचे झाले आहे. जिल्ह्यात ३० हजार १६७ जबरानजोतधारकांना पट्टे वितरित करण्यात आले. मात्र त्यापैकी २ हजार ५४८ शेतकऱ्यांना

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात वैयक्तिक स्वरूपाचे वनपट्टे वाटपाचे काम देशात प्रथम क्रमांकाचे झाले आहे. जिल्ह्यात ३० हजार १६७ जबरानजोतधारकांना पट्टे वितरित करण्यात आले. मात्र त्यापैकी २ हजार ५४८ शेतकऱ्यांना पट्ट्याच्या शेतीचा सातबारा देण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांना शासनाच्या कुठल्याही शेती योजनेचा लाभच मिळत नाही. त्यामुळे हे शेतकरी अडचणीत आले आहे.
केंद्र सरकारने २००८ मध्ये वन कायदा शिथिल केल्यानंतर अनेक वर्षापासून जमीन कसणारे भूमिस्वामी झाले. २०१३ पर्यंत ३० हजार १६७ जबरानजोतधारकांना वन जमिनीच्या पट्ट्याचे वाटप करण्यात आले. परंतु त्यातील २ हजार ५४८ पट्टेधारकांना अद्यापही महसूल विभागाकडून सातबारा देण्यात आलेला नाही. गडचिरोली तालुक्यात १९, धानोरा ४२४, चामोर्शी ६३६, मुलचेरा ३७०, देसाईगंज १४४, आरमोरी १४४, कुरखेडा १३१, कोरची २९, अहेरी १४६, सिरोंचा १८०, एटापल्ली २४५, भामरागड तालुक्यातील ८० जबरानजोतधारकांना सातबारा मिळालेला नाही. जिल्ह्यात ३० हजार १६७ पैकी २६ हजार ७७६ पट्टेधारकांना सातबारा देण्यात आला. मात्र २ हजार ५४८ पट्टेधारकांना अद्याप सातबारा मिळालेला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना पीक कर्ज आदी मिळण्यात अडचणी येत आहे. (शहर प्रतिनिधी)