मदना ग्रा.पं.वर महाविकास आघाडीचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:09 IST2021-02-13T04:09:01+5:302021-02-13T04:09:01+5:30
जलालखेडा : नरखेड तालुक्यातील मदना ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. आघाडीचे रूपराव मारोतराव हरणे उपसरपंच म्हणून ...

मदना ग्रा.पं.वर महाविकास आघाडीचा झेंडा
जलालखेडा : नरखेड तालुक्यातील मदना ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. आघाडीचे रूपराव मारोतराव हरणे उपसरपंच म्हणून बिनविरोध निवडून आले. मदना ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव होते. यासंवर्गातील एकही सदस्य नसल्याने सरपंचपद रिक्त राहिले. त्यामुळे उपसरपंचाकडेच येथील सरपंचपदाचा प्रभार राहणार आहे. गत १० वर्षांपासून मदना ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होत होती; परंतु यावेळेस हरणे, इंगोले विरुद्ध जाणे दोन गट आमनेसामने आले. महाविकास आघाडीच्या विरुद्ध ग्राम परिवर्तन पॅनल असा सामना रंगला. महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र हरणे यांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागली होती. महाविकास आघाडीमध्ये हरणे, इंगोले यांनी एकत्र येत निवडणूक लढवली. ७ पैकी ६ जागांवर विजय मिळविला होता.