नागपुरात उड्डाणपुलावर दोन गाड्यांची समोरासमोर धडक, दाम्पत्यासह पाच जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 23:15 IST2021-06-11T23:15:23+5:302021-06-11T23:15:50+5:30
flyover accident सदर येथील उड्डाणपुलावर कार आणि बेलोनोच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दाम्पत्यासह पाचजण जखमी झाले. शुक्रवारी सकाळी झालेल्या अपघातात जखमी लोकांना पोलिसांनी कारचा दरवाजा कापून बाहेर काढले.

नागपुरात उड्डाणपुलावर दोन गाड्यांची समोरासमोर धडक, दाम्पत्यासह पाच जण जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सदर येथील उड्डाणपुलावर कार आणि बेलोनोच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दाम्पत्यासह पाचजण जखमी झाले. शुक्रवारी सकाळी झालेल्या अपघातात जखमी लोकांना पोलिसांनी कारचा दरवाजा कापून बाहेर काढले.
वैभवनगर, दिघोरी निवासी ५० वर्षीय दिलीप ठाकरे वेकोलि, सिल्लेवाडी येथे कार्यरत आहे. ते त्यांचे सहकारी कृष्णा वानखेडे यांच्यासोबत सकाळी ८.३० वाजता आल्टो कार क्रमांक एमएच/३१/बीके/५०७ मध्ये सवार होऊन सदर उड्डाणपुलावरून मानकापूर चौकाच्या दिशेने कार्यालयात जात होते. पूनम चेंबरसमोर उलट दिशेने बेलाेरो कार क्रमांक एमपी/०४/व्हीजी/८५०६ मध्ये मुलताई निवासी सुनील कनाडे, त्यांच्या पत्नी ममता कनाडे आणि नातेवाईक विजय देशमुख येत होते. बेलोनो कारने आल्टोला धडक मारली. धडक जोरदार असल्याने ठाकरे कारमध्ये फसले. सदर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आल्टो कारचा दरवाजा कापून ठाकरे यांना बाहेर काढले. याशिवाय बेलोनो कारमध्ये सवार कनाडे दाम्पत्य आणि विजय देशमुख हेसुद्धा जखमी झाले. पोलिसांनी सर्वांना रुग्णालयात दाखल केले. कनाडे दाम्पत्य आणि ठाकरे यांना जास्त मार लागला आहे. घटनेवेळी पाऊस येत होता. त्यामुळेच बेलोनो चालकाचे नियंत्रण सुटल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.