अस्थमाच्या बाल रुग्णांमध्ये दरवर्षी पाच टक्क्याने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:13 AM2019-07-28T00:13:00+5:302019-07-28T00:14:02+5:30

वाढते प्रदूषण, शहरीकरण व बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव लहान मुलांमध्ये दिसून येऊ लागला आहे. विशेषत: श्वसनाशी संबंधित आजार वाढले आहेत. अस्थमाच्या रुग्णांमध्ये दरवर्षी चार ते पाच टक्क्याने वाढ होत आहे. याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत अकॅडमी ऑफ पेडियाट्रिकच्या (एओपी) पदधिकाऱ्यांनी आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केले.

A five percent increase in asthma pediatric patients every year | अस्थमाच्या बाल रुग्णांमध्ये दरवर्षी पाच टक्क्याने वाढ

अस्थमाच्या बाल रुग्णांमध्ये दरवर्षी पाच टक्क्याने वाढ

Next
ठळक मुद्देअकॅडमी ऑफ पेडियाट्रिक : श्वसन विकारावर कार्यशाळा

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : वाढते प्रदूषण, शहरीकरण व बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव लहान मुलांमध्ये दिसून येऊ लागला आहे. विशेषत: श्वसनाशी संबंधित आजार वाढले आहेत. अस्थमाच्या रुग्णांमध्ये दरवर्षी चार ते पाच टक्क्याने वाढ होत आहे. याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत अकॅडमी ऑफ पेडियाट्रिकच्या (एओपी) पदधिकाऱ्यांनी आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केले.
याप्रसंगी ‘एओपी’चे अध्यक्ष डॉ. रवी भेलोंडे, सचिव डॉ. महेश तुराळे व डॉ. शिल्पा हजारे उपस्थित होत्या.
डॉ. भेलोंडे म्हणाले, दमा अर्थात अस्थमा. श्वसननलिकेला सूज आल्यामुळे किंवा इजा झाल्यामुळे फुफ्फुसाला होणाऱ्या ऑक्सिजनच्या पुरवठ्याचे प्रमाण कमी होतो. त्यामुळे श्वासोच्छवास करताना त्रास होतो किंवा सतत धाप लागते. दमा हा आजार अनुवांशिकतेने अथवा वाढते प्रदूषण, दमट हवामान, ढगाळ वातावरण यामुळे त्रास होऊ शकतो
ग्रामीणपेक्षा शहरात धोका अधिक
डॉ. तुराळे म्हणाले, ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील नागरिकांना दम्याचा धोका अधिक आहे. वाढते शहरीकरण, गाड्यांची रहदारी तसेच अनेक ठिकाणी सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे वाढलेले धुळीचे प्रमाण यामुळे दम्याच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
बदललेली आहारपद्धती हे एक कारण
डॉ. हजारे म्हणाल्या, बदललेली आहारपद्धती हे सुद्धा दमा होण्यास प्रमुख कारणे मानले जाते. पिज्झा, बर्गर, फास्ट फूड, चिप्स, तळलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ तसेच वेगवेगळ्या पद्धतीची शीतपेये आदीचे अधिक सेवनही दमा होण्यास कारणीभूत ठरते.
दरवर्षी क्षयरोगाचे सव्वा लाख रुग्ण
डॉ. भेलोंडे म्हणाले, दरवर्षी क्षयरोगाचे सव्वा लाख रुग्ण आढळून येतात. क्षयरोगात न्युमोनियामुळे होणाºया मृत्यूचे दुसरे कारण ठरले आहे. विशेष म्हणजे, ‘मल्टी ड्रग रेजिस्टन्स टीबी’ (एमडीआर) ७० ते ८० हजार नवे रुग्णही दरवर्षी सामोर येत आहे. यात साधारण ८ टक्के लहान मुले असतात.
नागपुरात डायरियाचे ५० टक्के रुग्ण
सध्या नागपुरात ‘व्हायरल’चा प्रकोप सुरू असलातरी ५० टक्के रुग्ण हे ‘डायरिया’चे आहे. दूषित पाणी व स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने हा आजार होतो. या शिवाय, अ‍ॅलर्जी अस्थमा, डेंग्यूचे रुग्णही दिसून येऊ लागले आहेत.
‘पल्मोनोलॉजी’वर कार्यशाळा
‘एओपी’च्यावतीने २८ जुलै रोजी ‘आयएमए’ सभागृहात ‘पेडियाट्रिक पल्मोनोलॉजी’वर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी डॉ. एस.के. काबरा, डॉ. एस. नागभूषण व डॉ. उपेंद्र किंजवाडेकर उपस्थित राहतील.

Web Title: A five percent increase in asthma pediatric patients every year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.