शहरं
Join us  
Trending Stories
1
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
2
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
3
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात होणार दाखल
4
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
5
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
6
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
7
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
8
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
9
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
10
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
11
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
12
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
13
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
14
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
15
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
16
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
17
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
18
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
19
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
20
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आगीत होरपळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

By admin | Updated: May 24, 2014 01:28 IST

बहुमजली इमारतीच्या पार्किंगमध्ये लागलेल्या आगीत दोन चिमुकल्यांसह एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. गोकुलपेठेतील अजिंक्य प्लाझा अपार्टमेंटमध्ये गुरुवारी मध्यरात्री ही थरारक घटना घडली.

गोकुळपेठेतील थरार : नागपूरकर शहारले, शोककळा

नागपूर : बहुमजली इमारतीच्या पार्किंगमध्ये लागलेल्या आगीत दोन चिमुकल्यांसह एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. गोकुलपेठेतील अजिंक्य प्लाझा अपार्टमेंटमध्ये गुरुवारी मध्यरात्री ही थरारक घटना घडली. मृतांमध्ये एक ६० वर्षांची वृध्दा, तिची मुलगी, सून आणि दोन चिमुकली नातवंड आहेत. या भयानक घटनेने नागपूरकर सुन्न झाले आहेत. गोकुळपेठेतील कॉफी हाऊस चौकाजवळच्या भाजी बाजाराच्या पलिकडे अजिंक्य प्लाझा ही इमारत आहे. चार माळ्याच्या या इमारतीतील रस्त्यालगतचा तळमाळा आणि पहिला माळ्यावर व्यापारी गाळे (दुकाने)आहेत. आतल्या बाजूचा पहिला माळा पार्किंगसाठी वापरला जातो. येथे चौकीदाराची एक रूम आहे. बाजूलाच लिफ्ट असून, त्याच्या बाजूला विजेचे मिटर आहे. खाली जागेत तेथील रहिवाशांची वाहने असतात. गुरुवारी मध्यरात्री विजेच्या मिटरमध्ये ठिणग्या (स्पार्किंग) उडाल्या. त्या समोरच्या दुचाकीच्या सीटवर पडल्याने दुचाकीने पेट घेतला. नंतर बाकीच्या दुचाक्याही जळू लागल्या. आगीचा भडका उडाल्याचे पाहून चौकीदार लेखराज आपल्या खोलीतून बाहेर पडला. त्याने आरडाओरड करून आग लागल्याचे रहिवाशांना सांगितले. मध्यरात्री १ ते १.३० ची वेळ असल्याने आणि अनेकांचे कूलर सुरू असल्याने काहींना आवाजच गेला नाही. मात्र, पहिल्या माळ्यावर सलिला सिरिया (वय ६०) यांचा परिवार राहतो. गुरुवारी रात्री त्यांच्या घरात त्या, मुलगा निशाद, सून रागिणी, साडेतीन वर्षांचा नातू तसेच मुलगी श्रुती आणि तिची सहा महिन्यांची मुलगी असे एकूण सहा जण होते. आग लागल्याचे कळताच हे सर्व खाली निघाले. दारासमोरच लिफ्ट असल्यामुळे सलिला, रागिणी आणि श्रुती आपल्या चिमुकल्यांसह लिफ्टमध्ये शिरल्या. तर, निशाद वर राहणार्‍या मित्राला आगीची माहिती देण्यासाठी गेला. इकडे लिफ्ट खाली थांबल्यानंतर दार उघडले गेले अन् ८ ते १० दुचाक्यांनी पेट घेतल्याने पार्किंगमध्ये आगीने रौद्र रूप धारण केले होते. त्याची पुसटशी कल्पना लिफ्टमधील सलिला, रागिणी किंवा श्रुतीला नव्हती. दार उघडले जाताच आगीचा लोळ लिफ्टमध्ये शिरला. काही कळायच्या आतच या तिघी दोन चिमुकल्यांसह आगीने वेढल्या गेल्या. बचावाची कसलीही संधी नव्हती. लिफ्टचे दार बंद होत नव्हते अन् बटन दाबताच शॉर्ट सर्किटमुळे लिफ्टही जाम झाली. त्यामुळे दोन चिमुकल्यांसह पाचही जीवांचा कोळसा झाला. सहनिवासी बेखबर मध्यरात्रीनंतरच्या साखरझोपेत असलेल्या आजूबाजूच्यांना या पाच जणांच्या किंकाळ्यांनी हादरवले. त्यानंतर या भयानक घटनेने सर्वांच्याच अंगावर शहारे उमटले. कुणी पोलीस तर कुणी अग्निशमन दलाला माहिती देऊन घटनास्थळी बोलवून घेतले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवून कोळसा झालेले मृतदेह लिफ्टमधून बाहेर काढले. नातेवाईकांचा आक्रोश आज सकाळी या थरारक घटनेचे वृत्त आगीसारखे नागपुरात पसरले आणि घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली. दुपारी २ च्या सुमारास रुग्णालयातून मृतदेह इमारतीसमोर आणताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. मृतांमध्ये साडेतीन वर्षाचा चिमुकला आणि सहा महिन्यांची चिमुकली असल्यामुळे या घटनेची भीषणता अधिकच गडद झाली होती. नातेवाईकांसोबतच अनेक महिलांना अश्रू आवरत नव्हते. तीव्र शोकसंताप एकीकडे एवढी भीषण आग लागलीच कशी, असा सर्वसामान्यांचा प्रश्न होता. दुसरीकडे ज्या लिफ्टमध्ये ही घटना घडली, ती अत्यंत निमुळती आणि छोटी आहे. त्यात पार्किंगची जागाही अरुंद आहे. त्यामुळे लिफ्टला परवानगीच कशी देण्यात आली, असा संतप्त सवाल उपस्थितांमधून विचारला जात होता. दुसरीकडे लिफ्टच्याच बाजूला रहिवाशांचे विजेचे मिटर असलेला बोर्ड आणि त्याच ठिकाणी चौकीदाराचे सर्व्हंट क्वॉर्टर संबंधित अधिकार्‍यांना कसे काय खटकले नाही, असाही प्रश्न विचारला जात होता. अधिकार्‍यांची कुजबूज घटनास्थळी महापालिका आणि अग्निशमन दलाचे अधिकारी-कर्मचारी या घटनेच्या भीषणतेसोबतच ‘आता कसे करायचे’ असा प्रश्न एकमेकांना विचारून कुजबूज करीत होते. चार माळ्यांच्या या इमारतीतील पार्किंगची व्यवस्था, लिफ्टची व्यवस्था बघून त्यांनाही कळायचे ते कळले होते. त्यामुळे की काय हे अधिकारीही या घटनेचा अहवाल कसा तयार करायचा, यावर उभ्याउभ्याच खल करीत होते. इमारतीच्या पार्किंगमध्ये लागलेल्या आगीत जळून खाक झालेल्या मोटरसायकल.