शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
2
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
3
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
4
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
5
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
6
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
7
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
8
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
9
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
10
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
11
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
12
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
13
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
14
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
15
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
16
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
17
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
18
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
19
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
20
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
Daily Top 2Weekly Top 5

दोन अपघातांत पाच ठार

By admin | Updated: June 16, 2014 01:00 IST

वर्धा जिल्ह्यात नंदोरी नजीकच्या आरंभा टोल नाका परिसरात शनिवारी रात्री रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर मागावून भरधाव येणाऱ्या दुचाकी आदळली. यात दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाले.

वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यात : टिप्पर-दुचाकी धडकेत एक गंभीर
नंदोरी (वर्धा)/देवाडा(चंद्रपूर) : वर्धा जिल्ह्यात नंदोरी नजीकच्या आरंभा टोल नाका परिसरात शनिवारी रात्री रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर मागावून भरधाव येणाऱ्या दुचाकी आदळली. यात दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाले. तसेच चंद्रपूर जिल्ह्यात देवाडापासून आठ किलोमीटरवरील सातारा येथे टिप्पर आणि दुचाकी अपघातात तीन ठार व एक गंभीर जखमी आहे.
आरंभा टोल नाका अपघातात नितीन भगत (३०) आणि उमेश आतुटकर (३२) दोघेही रा. तासगाव, ता. समुद्रपूर, जि. वर्धा यांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नितीन आणि उमेश हे दोघेही एमएच-३२ एफ-०५२० या दुचाकीने गावी परत येत होते. दरम्यान, नागपूर-चंद्रपूर महामार्गावर आरंभा टोलनाका परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सीजी ०४ जे २३१ या ट्रकवर त्यांची दुचाकी जोरदार आढळली. त्यात दोघेही जागीच ठार झाले. रस्त्यावर अंधार असल्यामुळे त्यांना रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक दिसला नसावा व हा अपघात झाला असावा असा संशय व्यक्त होत आहे.
समुद्रपूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक कुणाचा होता हे अद्याप कळू शकले नाही. घटनेचा तपास समुद्रपूर पोलिस करीत आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा येथून आठ कि.मी. अंतरावर असलेल्या सातारा येथे टिप्पर आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात तीन जण ठार तर, एक जण गंभीर जखमी झाले.
ही घटना शनिवारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान घडली. शालिक सात्रे (४०), प्रदीप खेडेकर (४५) दोघेही गंगापूर तसेच सोनटक्के नामक एकाचा मृतामध्ये समावेश आहे. तर गडचिरोली जिल्ह्यातील नागुलवाही येथील रवी राऊत गंभीर जखमी आहे.
राजुरा तालुक्यातील काही गावांमध्ये बंधारा बांधण्याचे काम सुरु आहे. या बंधाऱ्याचे काम आटोपून चारही जण दुचाकीने पोंभुर्णाकडे जात होते. दरम्यान पोंभुर्णा येथून रेती घेऊन चंद्रपूरकडे टिप्पर येत असताना सातारा गावाजवळ अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच उमरी पोलिसांनी जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान शालिक सात्रे, प्रदीप खेडेकर यांचा मृत्यू झाला. तर गंभीर असलेले सोनटक्के आणि रवी राऊत यांना नागपूर येथे हलविण्यात आले.
मात्र सोनटक्के यांचा नागपूर येथे नेत असतानाच मृत्यू झाला तर रवीची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. घटनेचा पुढील तपास उमरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार जे.की. शेख यांच्यासह पोलीस कर्मचारी करीत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)