शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
2
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
3
Top Marathi News Live: मुंबई: मरीन ड्राईव्हवर मोठा अपघात, बाईकने एकाला उडवलं, तिघांचा मृत्यू
4
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
5
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
6
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
7
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
8
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
9
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
10
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
11
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
12
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
13
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
14
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
15
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
16
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
17
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
18
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
19
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
20
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
Daily Top 2Weekly Top 5

निर्मल ग्राम योजनेचा फज्जा

By admin | Updated: November 11, 2014 01:09 IST

भिवापूर तालुक्यातील नांद येथे निर्मल ग्राम योजना राबविण्यात आली. मात्र, या गावात सर्वत्र घाण पसरली आहे. येथील सार्वजनिक शौचालयाचा वापर कुणीही करीत नाही. विशेष म्हणजे, या गंभीर प्रकाराकडे

नांद येथे घाणीचे साम्राज्य : सार्वजनिक शौचालयाचा वापर होणार कधी?राम वाघमारे - नांदभिवापूर तालुक्यातील नांद येथे निर्मल ग्राम योजना राबविण्यात आली. मात्र, या गावात सर्वत्र घाण पसरली आहे. येथील सार्वजनिक शौचालयाचा वापर कुणीही करीत नाही. विशेष म्हणजे, या गंभीर प्रकाराकडे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. राज्य शासनाच्यावतीने निर्मल ग्राम योजनेवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. नांद येथे स्थानिक ग्रामपंचायतच्यावतीने ही योजना राबविण्यात आली. ग्रामपंचायत प्रशासनाने हागणदारीमुक्त गाव करण्याचा संकल्प केल्याने या योजनेंतर्गत नांद येथे सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करण्यात आले. या शौचालयात पाण्यासह अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. परंतु, स्थानिक ग्रामस्थ या सार्वजनिक शौचालयाचा वापर न करता उघड्यावर जाणे पसंत करीत आहेत. परिणामी, लाखो रुपये खर्च करूनही या योजनेला हरताळ फासला जात आहे.सदर शौचालयाचे बांधकाम वर्षभरापूर्वी स्थानिक आठवडी बाजारालगत असलेल्या रिकाम्या जागेवर करण्यात आले. रंगरंगोटी करण्यात आलेल्या या शौचालयाची प्रत्यक्ष पाहणी केली असता, त्याच्या दाराला सदैव कुलूप लावले असल्याचे दिसून येते. या शौचालयाच्या शेजारी नागरिक उघड्यावर शौचास बसतात. त्यामुळे या सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम नेमके कशासाठी केले, असा प्रश्न उपस्थित होतो. गावात येणाऱ्या प्रत्येक रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात घाण आहे. या शौचालयापासून अवघ्या २०० मीटरवर सरपंच भारती भैसारे यांचे घर आहे. शौचालयालगत रस्ता गावात येत असल्याने या रस्त्यावरून सतत वर्दळ असते. याच रस्त्यावर ग्रामपंचायत कार्यालय व आरोग्य केंद्रही आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या - येणाऱ्या प्रत्येकाला या घाणीच्या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. ग्रामपंचायत प्रशासनाने गावात ग्राम स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवून परिसरात पसरलेली घाण साफ करण्याची तसेच दोषींवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.