उप्पलवाडी प्लास्टिक कंपनीला आग, लाखोंचे साहित्य जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 14:08 IST2021-11-29T14:03:13+5:302021-11-29T14:08:06+5:30
कामठी रोड उप्पलवाडी औद्योगिक वसाहतीतील एका प्लास्टिक कारखान्याला आज सकाळी ६:३० च्य सुमारास आग लागली. या घटनेत कच्चा व पक्का माल जळून खाक झाल्याची माहिती आहे.

उप्पलवाडी प्लास्टिक कंपनीला आग, लाखोंचे साहित्य जळून खाक
नागपूर : उप्पलवाडी येथील एका प्लास्टिक कंपनीला आग लागून लाखोंचे साहित्य जळून खाक झाले. ही घटना आज सकाळी ६:३० च्या सुमारास घडली.
कामठी रोड उप्पलवाडी औद्योगिक वसाहतीतील एका प्लास्टिक कारखान्याला आज सकाळी ६:३० च्य सुमारास आग लागली. या घटनेत तीन गोदाम जळून जळून खाक झाल्याची माहिती आहे. आगीचे कारण अद्याप समजु शकले नाही. आग नियंत्रणात असल्याचे अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आगीच्या घटनेची समीक्षा केल्यानंतर कारण समजु शकेल असे अधिकारी म्हणाले.