मेट्रो स्टेशनवरील आग २० मिनिटात आटोक्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 22:57 IST2019-02-13T22:56:15+5:302019-02-13T22:57:44+5:30
बुधवारी दुपारी १२.०४ च्या सुमारास अग्निमशन विभागाच्या नरेंद्रनगर स्टेशनला मेट्रो रेल्वेच्या छत्रपती चौकातील स्टेशनवर आग लागण्याची सूचना मिळाली. अग्निशमन विभागाचे पथक अवघ्या चार मिनिटात घटनास्थळी पोहचले. जखमींना बाहेर काढून आरोग्यम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल के ले. २० मिनिटात जवानांनी ही आग आटोक्यात आली. मॉक ड्रील दरम्यान हा थरार नागरिकांना बघायला मिळाला.

मेट्रो स्टेशनवरील आग २० मिनिटात आटोक्यात!
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बुधवारी दुपारी १२.०४ च्या सुमारास अग्निमशन विभागाच्या नरेंद्रनगर स्टेशनला मेट्रो रेल्वेच्या छत्रपती चौकातील स्टेशनवर आग लागण्याची सूचना मिळाली. अग्निशमन विभागाचे पथक अवघ्या चार मिनिटात घटनास्थळी पोहचले. जखमींना बाहेर काढून आरोग्यम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल के ले. २० मिनिटात जवानांनी ही आग आटोक्यात आली. मॉक ड्रील दरम्यान हा थरार नागरिकांना बघायला मिळाला.
एन.सी.सी.लिमिटेड नागपूर मेट्रो प्रोजेक्ट आणि नागपूर महापालिके च्या अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागांच्या संयुक्त विद्यमाने मॉक ड्रील घेण्यात आली. यात छत्रपती मेट्रो स्टेशन वाया डक्ट येथे एन.सी.सी.लिमिटेड द्वारा तात्काळ बचाव कार्य व आगीपासून नियंत्रण करण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले.
एन.सी.सी.लिमिटेडच्या सुरक्षा अधिकाऱ्यांकडून नरेंद्रनगर अग्निशमन स्थानकाला १२.०४ वाजता आगीची सूचना देण्यात आली व संपूर्ण बचाव कार्य १२.२५ मिनिटांनी पूर्ण करण्यात आले. अवघ्या २० मिनिटांमध्ये बचाव कार्य पूर्ण करण्यात आले. यात बनावट जखमी कामगारांना आग आटोक्यात आणून बाहेर काढण्यात आले. त्यांना प्रथमोपचार करण्यात आले व काही गंभीर जखमींना आरोग्यम हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्या नेतृवाखाली नरेंद्रनगर अग्निशमन स्थानकाचे स्थानाधिकारी धर्मराज नाकोड , सी.बी. तिवारी, अतुल निंबर्ते. आपदा प्रबंधन कक्षाचे केशव कोठे व सुनील राऊत आणि वाहन चालक अनिल बालपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिक करण्यात आले. या प्रात्यक्षिकामध्ये एन. सी.सी.लिमिटेडचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक प्रफुल्ल मंगरुळकर, देवेंद्र रामटेकर, विद्यासागर, स्वामिनाथन, सोमशेखर (मुख्य सुरक्षा व्यवस्थापक एन.सी.सी.ली.) यांनी या सर्व कार्यक्रमाबद्दल माहिती दिली.
नागपूर अग्निशमन व आणीबाणी सेवा यांच्या कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सुरक्षा अधिकारी सुनील हरिचंदन, विजय मिश्रा, स्वप्नील बानकर, राजेश डेहनकर, सुमन भारती, गौतम बिस्वास आदींनी सुरक्षित काम करण्याची प्रतिज्ञा घेतली.