पोलिस आयुक्तालयातील रेकॉर्ड विभागात आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2023 09:53 PM2023-01-23T21:53:27+5:302023-01-23T21:53:53+5:30

Nagpur News सिव्हिल लाइन्स येथील पोलिस आयुक्तालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील रेकॉर्ड विभागात सोमवारी आग लागली. यात कुणीही जखमी झाले नसले तरी काही फाईल्स यात जळून खाक झाल्या.

Fire in records section of Police Commissionerate | पोलिस आयुक्तालयातील रेकॉर्ड विभागात आग

पोलिस आयुक्तालयातील रेकॉर्ड विभागात आग

Next

नागपूर : सिव्हिल लाइन्स येथील पोलिस आयुक्तालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील रेकॉर्ड विभागात सोमवारी आग लागली. यात कुणीही जखमी झाले नसले तरी काही फाईल्स यात जळून खाक झाल्या. ही घटना सोमवारी दुपारी ३.३० वाजता घडली.

पोलिस कल्याण शाखेचे कार्यालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास रेकॉर्ड रूममधून धूर येत असल्याची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत जवळपास २५ फाईल्स जळून खाक झाल्या. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Web Title: Fire in records section of Police Commissionerate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग