शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन विभागाने अत्याधुनिक तंत्राचा वापर करावा

By admin | Updated: April 16, 2016 02:34 IST

शहराचा विकास होत आहे. मिहान, मेट्रो यासाखे मोठे प्रकल्प उभे राहात आहेत. शहराचा वाढता व्याप व उभ्या राहात

प्रवीण दटके : अग्निशमन सेवा दिवस कार्यक्रमात शानदार प्रात्यक्षिकेनागपूर : शहराचा विकास होत आहे. मिहान, मेट्रो यासाखे मोठे प्रकल्प उभे राहात आहेत. शहराचा वाढता व्याप व उभ्या राहात असलेल्या गगनचुंबी इमारती विचारात घेता अग्निशमन दलाने साधनामध्ये काळानुरुप बदल करून अत्याधुनिक तंत्राचा वापर करावा, असे आवाहन महापौर प्रवीण दटके यांनी गुरुवारी केले. अग्निशमन सेवा दिवसानिमित्त चिटणवीस पार्क येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दरवर्षी महापालिका मुख्यालयाच्या हिरवळीवर हा कार्यक्रम आयोजित केला जात होता. परंतु यंदा प्रथमच मुख्यालयाबाहेर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. व्यासपीठावर आमदार अनिल सोले, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, आयुक्त श्रावण हर्डीकर, परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर, आरोग्य समितीचे सभापती देवेंद्र मेहर, विधी समितीचे सभापती अ‍ॅड. संजय बालपांडे, झोन सभापती प्रभा जगनाडे, मनीषा कोठे, उपायुक्त रंजन लाडे, अतिरिक्त उपायुक्त प्रमोद भुसारी, जयंत दांडेगावकर, अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके आदी उपस्थित होते.अग्निशमन विभागाला गौरवशाली परंपरा आहे. जवान मर्यादित साधनात जीवाची पर्वा न करता कर्तव्य भावनेतून काम करीत असतात. याची जाणीव विद्यार्थी, नागरिक व व्यावसायिकांना व्हावी, या हेतूने हा कार्यक्र म लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने चिटणवीस पार्क येथे आयोजित करण्यात आला. पुढील वर्षात भव्य प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. अग्निशमन विभागाला अधिक सक्षम करण्यासाठी टीटीएल खरेदीसाठी तरतूद केली असून ती लवकरच विभागाच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती दटके यांनी दिली. अग्निशमन विभागात जबाबदारी उत्तमपणे बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी प्रशासन उभे असते. ही सेवा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्त्वाची आहे. प्रत्येक इमारतीत स्वत:ची अग्निशमन सुरक्षा यंत्रणा असली पाहिजे. यासाठी अधिकाधिक इमारतींचे फायर आॅडिट करण्याची गरज असल्याचे हर्डीकर यांनी सांगितले. कर्तव्य बाजवताना मृत्यू झालेल्या जवानांना शहीद समजण्यात यावे, अशी सूचना बंडू राऊ त यांनी केली. प्रारंभी विभागातील शहीद जवानांना दटके, हर्डीकर यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली अर्पण केली. विभागात सेवा बजावलेल्या शहीद कुुटुंबीयातील चंद्रकला कुहीकर व शांताबाई ठाकरे यांचा शाल व श्रीफळ देऊ न गौरव करण्यात आला. गोंदिया येथे बोअरवेल दुर्घटेनत बालकाचे प्राण वाचविल्याबद्धल स्थानाधिकारी धर्मराजजी नाक ाडे, जी.एन. कावळे, सी.एस. बालपांडे व पंधरे आदींचा सत्कार करण्यात आला. तसेच विभागातर्फे आयोजित स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. राजेंद्र उचके यांनी प्रास्ताविकातून वर्षभरातील विभागाच्या कामाची माहिती दिली. कार्यक्रमासाठी एन.के.गुडधे, आर.आर दुबे, आर.एम. सिरकीरवार, एस.के. काळे, सुनील राऊ त, केशव कोठे, जगदीश बैस, सी.बी.तिवारी, एस.एम. डहाळकर आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)