लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: शहराच्या मध्यभागी असलेल्या कॉटन मार्केट येथील ठोक भाजी बाजारात बुधवारी दुपारी ४.१५ च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत दलालांची १८ दुकाने जळून खाक झाली. आगीमुळे परिसरात सर्वत्र धूर पसरला होता. अग्निशमन विभागाच्या सात वॉटर टेंडरने ही आग आटोक्यात आणली.कॉटन मार्केट येथील ठोक भाजीबाजारात दलालांनी टिनशेडची दुकाने उभारलेली आहेत. येथे १५० हून अधिक भाजी दलाल आपला ठोक व्यापार करतात . दररोज पहाटे ५ वाजतापासून येथील भाजीबाजार भरतो. दुपारी २ वाजेपर्यंत हा भाजीबाजार असतो. कोरोनामुळे येथील भाजीबाजार लवकरच उठतो. अशातच दुपारी ४.१५च्या सुमारास दुकानांना अचानक आग लागली. थोड्याच वेळात आग इतरत्र पसरली. आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला प्राप्त होताच अवघ्या दहा मिनिटात अग्निशमन विभागाच्या सात गाड्या घटनास्थळी पोहचल्या. अर्धा तासात आग नियंत्रणात आली. अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके यांच्या मार्गदर्शनाखाही पथकाने ही आग आटोक्यात आणली. आगीत व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आगीचे कारण कळू शकले नाही. उन्हाळ्याच्या दिवसात शहरात आगीच्या घटनेत वाढ होते. याची सुरुवात कॉटन मार्केट पासून झाली आहे.
नागपुरातील कॉटन मार्केट भाजीबाजारात आग : १८ दुकाने खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 20:35 IST
शहराच्या मध्यभागी असलेल्या कॉटन मार्केट येथील ठोक भाजी बाजारात बुधवारी दुपारी ४.१५ च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत दलालांची १८ दुकाने जळून खाक झाली. आगीमुळे परिसरात सर्वत्र धूर पसरला होता. अग्निशमन विभागाच्या सात वॉटर टेंडरने ही आग आटोक्यात आणली.
नागपुरातील कॉटन मार्केट भाजीबाजारात आग : १८ दुकाने खाक
ठळक मुद्देव्यापाऱ्यांचे मोठे नुकसान