शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

तारसा शिवारात अग्नितांडव

By admin | Updated: April 23, 2016 03:07 IST

उन्हाचा पारा वाढत असतानाच ग्रामीण भागात आगीच्या घटना घडत आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास

जीवितहानी टळली : जनावरांचे वैरण व शेतीपयोगी साहित्याची राखतारसा : उन्हाचा पारा वाढत असतानाच ग्रामीण भागात आगीच्या घटना घडत आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मौदा तालुक्यातील तारसा शिवारातील तारसा - इसापूर मार्गालगतच्या शेतांमधील पालापाचोळ्याने पेट घेतला. हवा जोरात वाहात असल्याने शेतकऱ्यांना या आगीवर वेळीच नियंत्रण मिळविणे शक्य झाले नाही. त्यामुळे या आगीत शेतांमधील तणसाचे ढीग, पीव्हीसी, एचडीपीई व रबरी पाईप, शेतांमधील झोपडी, टीनपत्रे यासह शेतीपयोगी साहित्याची राख झाली. यात अंदाजे ६० ते ६५ शेतकऱ्यांचे एकूण लाखो रुपयांचे नुकसान झाले. तारसा येथील बहुतेकांची शेती तारसा - इसापूर मार्गालगत तसेच बाबदेव शिवारातील सांड नदी ते पिपळा मायनर परिसरात आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी तारसा - इसापूर मार्गावरील शेतातील कचऱ्याने पेट घेतला. सुरुवातीला याकडे कुणाचेही लक्ष न गेल्याने आगीने अल्पावधीतच उग्र रूप धारण केले. याच काळात हवा जोरात वाहात असल्याने तसेच प्रत्येक शेतात धानाच्या तणसाचा कचरा असल्याने ही आग झपाट्याने पसरत गेली. आग लागल्याचे लक्षात येताना नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र, जोराच्या हवेमुळे ही आग नियंत्रणात आली नाही. याचवेळी परिसरातील अंदाजे ३० ते ३५ शेतांमध्ये जनावरे चरत होती. ही सर्व जनावरे मोकळी असल्याने त्यांनी आगीची झळ पोहोचताच पळ काढला. त्यामुळे आगीत कोणतीही प्राणहानी झाली नाही. परंतु, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतांमधील शेतीपयोगी साहित्य उचलणे शक्य झाले नाही. त्यामुळे तारसा येथील चांगदेव गिरडकर यांच्या शेतातील गोठा, गोठ्यावरील ५५ टीनपत्रे, ६० पीव्हीसी पाईप, पाच बॅग सोडा तसेच इतर शेतीपयोगी साहित्य खाक झाले. याशिवाय, गिरडकर यांच्या शेतालगत असलेल्या मंगेश देशमुख, जानबा समर्थ, शिवाजी बोपुट्टी, राजू आंबिलडुके, नरेंद्र देशमुख, जालीम पटिये, शेखर हारोडे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या शेतांमधील तणसाचे ढीग व इतर साहित्याची राख झाली. विशेष म्हणजे, या भागात तणसाचा वापर जनावरांचा चारा म्हणून केला जातो. या आगीने तारसा - इसापूर तसेच बाबदेव शिवारातील सांड नदी ते पिपळा मायनर दरम्यानची शेती कवेत घेतली होती. हा संपूर्ण परिसर किमान एक कि.मी. आहे. शेतकऱ्यांनी या आगीची माहिती मौदा पोलीस तसेच महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली. जोरात वाहणाऱ्या हवेमुळे ही आग रात्रीपर्यंत धुमसत होती. (वार्ताहर)