Video : नागपुरात लकडगंज परिसरातील आरा मशिनला भीषण आग; ८ दुकाने जळून स्वाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 11:08 IST2022-04-07T10:35:15+5:302022-04-07T11:08:25+5:30

आज सकाळच्या सुमारास लकडगंजमधील लाकडाच्या गोडाऊनला भीषण आग लागली. यामध्ये ६ आरा मशिन व ७-८ दुकाने जळून स्वाहा झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Fire at six saw machines in Lakdaganj area, major damage in the fire | Video : नागपुरात लकडगंज परिसरातील आरा मशिनला भीषण आग; ८ दुकाने जळून स्वाहा

Video : नागपुरात लकडगंज परिसरातील आरा मशिनला भीषण आग; ८ दुकाने जळून स्वाहा

नागपूर : लकडगंज परिसरातील भंडारा रोडवरील हरिहर मंदिर नजीकच्या आरा माशिनला गुरुवारी सकाळी भीषण आग लागली असून सहा आरा मशिन जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या ९ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

माहितीनुसार आज सकाळच्या सुमारास लकडगंजमधील लाकडाच्या गोडाऊनला आग लागली. ही बाब निदर्शनास येताच नागरिकांनी अग्नीशमन दलाला माहिती दिली. पाहता-पाहता आगीचे लोळ उठू लागले व तिने रौद्ररुप धारण केले. अग्निशमन दलाचा ताफा घटनास्थळी पोहोचला असून आग आटोक्यात आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. 

या आगीत ६ आरा मशिन व ७-८ दुकाने जळून स्वाहा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही. मात्र, लाकडाचे गोडाऊन असल्याने आग मोठ्या प्रमाणात भडकली. या घटनेत आसपासच्या दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Web Title: Fire at six saw machines in Lakdaganj area, major damage in the fire